शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर, माढा लोकसभा निवडणूक; मतदान केंद्रावर काय काय असणार मतदारांसाठी सेवासुविधा? जाणून घ्या

By appasaheb.patil | Updated: May 5, 2024 13:31 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - सोलापूरमाढा लोकसभेसाठी मंगळवार ७ मे रोजी मतदान होणार आहे. आज दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन वेगाने प्रयत्न करीत आहे. दरम्यान, जिल्ह्यात ३ हजार ६१७ मतदान केंद्र असून मतदानासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतची वेळ असणार असून मतदारांसाठी आवश्यक त्या सेवासुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, प्रत्येक मतदान केंद्रावर ३० ओ. आर. एस. पॉकेट, मतदान रांगेत ठराविक अंतरात खुर्च्या किंवा बेंचची सुविधा, स्वयंसेवक, मोबाईल हेल्थ टीम, प्रथमोपचार किट, हिरकणी कक्ष या उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था, मतदान केंद्राची आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता, शौचालयाची स्वच्छता सह अन्य सर्व सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर जेष्ठ मतदारांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हील चेअर ची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक ही नियुक्त करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे, त्या ठिकाणी बी. एल.ओ. ची नियुक्ती केलेली आहे. मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाच व पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडींग चा वापर केलेला असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग