शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

By राकेश कदम | Updated: April 25, 2024 13:36 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत.

- राकेश कदम साेलापूर - साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची २९ एप्रिल राेजी साेलापुरात जाहीर सभा हाेणार आहे. काॅंग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिलऐवजी २९ एप्रिल राेजी साेलापुरात हाेणार असल्याचे काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत. भाजपची मदार माेदींच्या सभेवर असल्याचे नेते सांगतात. पंतप्रधान माेदी यांची साेमवारी सकाळी हाेम मैदानावर सभा हाेणार आहे. भाजप नेत्यांची बुधवारी सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरू केली हाेती. उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिल राेजी हाेणार आहेत. यात बदल झाला आहे. ही सभा २९ एप्रिल राेजी संध्याकाळी कर्णिक नगर येथील मैदानावर हाेईल.

सिध्दरामय्या, रेवंथ रेड्डीही येणारकाॅंग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांच्या दाेन सभा शनिवारी हाेणार आहेत. दक्षिण साेलापूर तालुक्यातील भंडारकवठे आणि कुंभारी येथे या सभा हाेतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीही पूर्व भागात सभा घेणार आहेत. त्यांची तारीख निश्चित झालेली नाही. काॅंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचा साेलापुरात राेड शाे व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे