शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 09:02 IST

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी ११ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.

Barshi Vidhan Sabha ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बार्शी विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या ३१ उमेदवारांपैकी  ११ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात २० उमेदवार राहिले आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे सहा उमेदवार आहेत तर १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. 

उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन मतदान यंत्रे लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एफ. आर. शेख म्हणाले की, बार्शी विधानसभा मतदारसंघात छाननीनंतर ३१ उमेदवारी अर्ज शिल्लक होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटच्या दिवशी ११ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. भाऊसाहेब आंधळकर, परमेश्वर पासले, युवराज काटे, आनंद काशीद विजय साळुंखे या पाच जरांगे पाटील समर्थक तर नंदकुमार जगदाळे, दिलीप साठे, प्रमोद घोडके, रामेश्वर कुलकर्णी, अनिल गवसाने, गुलमोहम्मद अतार या स्वतंत्रपणे अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 

आता निवडणुकीच्या आखाड्यामध्ये २० उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यामध्ये मनोज कांबळे (बहुजन समाज पार्टी), दिलीप सोपल (उद्धवसेना), राजेंद्र राऊत (शिंदेसेना), आनंद यादव (महाराष्ट्र राज्य समिती), किशोर गाडेकर (रासप), धनंजय जगदाळे (वंचित बहुजन आघाडी) या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर अब्बास शेख, आकाश दळवी, इस्माईल पटेल, अॅडव्होकेट किरण मांजरे, किशोर देशमुख, साहेबराव देशमुख, मधुकर काळे, मोहसीन पठाण, मोहसीन तांबोळी, लालू सौदागर, वर्षा कांबळे, विनोद जाधव, शरीफ शेख व समीर सय्यद या १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर तात्काळ चिन्हांचीदेखील वाटप करण्यात आले आहे.

जरांगे-पाटील समर्थक देशमुख यांचा अर्ज कायम 

जरांगे पाटील समर्थक सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील पाच जणांनी माघार घेतली. तर आम्ही सर्व एक म्हणत अर्ज दाखल केलेले बाजार समितीचे माजी संचालक साहेबराव देशमुख यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला. आज दिवसभर देशमुख हे नॉट रिचेबल होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणbarshi-acबार्शी