शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माढा मतदारसंघात म्हणे, लढ बापू.. ‘दक्षिण’वाले म्हणे, ‘जाऊ द्या ना बापू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:32 IST

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि ...

ठळक मुद्देसहकारमंत्री सुभाष देशमुख माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा विरोधजर बापू माढ्यात उभारणार असतील तर आधी आमचे राजीनामे घ्या - कार्यकर्ते‘आमचे राजीनामे मंजूर करा आणि मग माढ्याला जा’ अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी तर साष्टांग दंडवतच घातला

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये आणि दक्षिण सोलापूरचा मतदारसंघ सोडू नये या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समर्थकांनी रविवारी दुपारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्क  कार्यालयासमोर आंदोलन केले़ विशेष म्हणजे यावेळी काही कार्यकर्त्यांनी देशमुखांचे पायही धरले. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुरुनाथ कुलकर्णी यांनी त्यांची समजूत काढली आणि या भावना पक्षनेतृत्वाला कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी माघार घेतली.

सहकारमंत्री सुभाष देशमुख माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध होता़ ही खदखद व्यक्त करण्यासाठी रविवारी सकाळी दक्षिण सोलापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, यतीन शहा, श्रीशैल व्हनमाने यांच्यासह काही सरपंच होटगी रोडवरील सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले़ त्यांचे पुत्र मनीष देशमुख यांच्याकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त     केल्या़ जर बापू माढ्यात उभारणार असतील तर आधी आमचे राजीनामे घ्या, असे निक्षून सांगितले आणि फोना-फोनी सुरु झाली़ हळूहळू कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आणि त्यांचा मोर्चा संपर्क कार्यालयाकडे वळला.

सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांपर्यंत ही चर्चा गेली. तासाभरात संपर्क कार्यालयासमोर मंडप उभारण्यात आला आणि कार्यकर्ते उपोषणाला बसले.

महापौर शोभा बनशेट्टी, दक्षिण सोलापूरच्या सभापती सोनाली कडते, उपसभापती संदीप टेळे, उत्तर सोलापूरच्या सभापती संध्याराणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे, शहराध्यक्ष प्रा.अशोक निबर्गी, नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, राजश्री बिराजदार, सुभाष शेजवाल, संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, सचिन कल्याणशेट्टी, आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर, इंद्रजित पवार, श्रीमंत बंडगर, प्रशांत क डते, अण्णाराव बाराचारे, शिरीष पाटील, एम.डी. कमळे,  हणमंत कुलकर्णी, कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या विनायक सुतार, काशिनाथ कदम यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले.

या घटनेची माहिती मिळताच सहकारमंत्री देशमुख उपोषण स्थळी धावून आल़े  त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते़ ‘माढा नको, दक्षिण हवे’ ही एकच घोषणा देत होत़े ‘आमचे राजीनामे मंजूर करा आणि मग माढ्याला जा’ अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी तर साष्टांग दंडवतच घातला़ या प्रकाराने देशमुख चकित झाले़ ‘मला अडचणीत आणण्याचा उद्योग करू नका़’ असे बजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यर्थ ठरला़ जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि  प्रदेश भाजपाचे रघुनाथ कुलकर्णी आले त्यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वाढलेल्या गर्दीने आम्हाला न्याय द्या असा एकच धोशा लावला़ 

वल्याळ यांनी केलेली चूक बापूंनी करु नये - नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले, लिंगराज वल्याळ शहर उत्तर विधानसभा सोडून लोकसभेसाठी उभे राहिले. त्यानंतर शहर उत्तरची जागा काँग्रेसकडे गेली. ही चूक बापूंनी करु नये. यावेळी नगरसेवक राजेश काळे यांनी आपल्या मनपा सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्याकडे दिला. नगरसेवक सुभाष शेजवाल, श्रीनिवास करली यांनीही राजीनामा देण्याचा इशारा दिला. तुम्ही माढ्याकडे गेला तर भाजपा कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखStrikeसंपBJPभाजपा