शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसाचा फटका: युरोप, अफ्रिकेतून परदेशी पाहुणे सोलापुरात; हिरज, नान्नज, बोरामणीत मुक्काम

By शीतलकुमार कांबळे | Updated: October 21, 2023 12:27 IST

दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस येणारे परदेशी पक्षी यंदा उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.

सोलापूर : या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्याचा परिणाम हा माणसांसोबतच सर्वांवर होत आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस येणारे परदेशी पक्षी यंदा उशिरा म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात येत आहेत.वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे सदस्य हिरज, होटगी तलाव, नान्नज व बोरामणी माळरानावर, चपळगाव येथे पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. तिथे त्यांना भरपूर प्रमाणात स्थानिक व परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षणासहित नोंदी घेण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सप्टेंबरअखेरीस होत असते. थंडी उशिरा सुरू होत असल्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत आहे.

पक्ष्यांचे खाद्य शेतातील ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन या पिकांवर लागणारी कीड, कीटक, टोळ हे प्रमुख आहे. त्यामुळे हे पक्षी शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारी अखेरीपर्यंत असते.

स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, अजित चौहान, ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, नीलेश भंडारी, विनय गोटे, शिवानी गोटे, सूरज धाकपाडे, सिद्धांत चौहान, आदींनी घेतल्या.

येथून येताहेत परदेशी पाहुणे -पश्चिम घाट, युरोप, कजाकिस्तान, पाकिस्तान, सायबेरिया, दक्षिण आफ्रिका, चीन, मंगोलिया अशा अनेक देशांतून पक्षी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. चिमणी इतक्या आकारापासून रोहित पक्ष्यासारख्या आकारापर्यंत असलेले पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर