शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

सोळा दुचाकींवरुन फिरत क्षय रुग्णांवर नजर; आरोग्य विभागाकडे ७७ ॲम्ब्युलन्सचा ताफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 12:46 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात

राजकुमार सारोळेसोलापूर : जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी ७७ ॲम्बुलन्स तर टीबीच्या रुग्णांना खास सेवा देण्यासाठी १६ मोटरसायकलींचा वापर केला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. प्रत्येक केंद्रात एक ॲम्बुलन्स आहे. गरोदर महिलांची ने -आण व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना सेवा दिली जाते. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालयातून औषध आणण्यासाठी या चार चाकी वापरल्या जातात. शासनाने ही वाहने खरेदी करून दिली आहेत. या वाहनांना १२ ते १५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे जुनी वाहने बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरोदर महिलांना वेळेत उपचारास नेण्यास ही सेवा उपयुक्त आहे. 

चारचाकी ॲम्ब्युलन्सबराेबर क्षयरोग विभागाला १६ मोटरसायकली दिलेल्या आहेत. अकरा तालुक्यात प्रत्येकी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. हा पर्यवेक्षक तालुक्यातील रुग्णांना औषधोपचार व तपासणीचा फाॅलोअप घेतो. रुग्णाकडे ये जा करण्यासाठी आरोग्य विभागाने पर्यवेक्षकाला खास मोटरसायकल दिली आहे. याचबरोबर सोलापूर शहरात पाच पर्यवेक्षक काम करतात.  या मोटरसायकली खरेदी करून बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे आता नव्याने आठ मोटरसायकली घेण्यात येत आहेत. क्षयरोगाबरोबर कुष्ठरोग असणाऱ्यांना सेवा देण्याचे काम केले जाते. 

दुचाकीच्या माध्यमातून केली जाणारी कामे

  • - कुष्ठरोग विभागाकडे असलेल्या मोटरसायकली पर्यवेक्षकांना दिलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यास एक प्रमाणे ११ पर्यवेक्षक आहेत.
  • - शहरात पाच पर्यवेक्षक आहेत. ते रुग्णांना भेटी देऊन औषधोपचार करतात. रुग्णांच्या स्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल कळवितात. 

चारचाकीतून केली जाणारी कामे

  • - गरोदर महिलेस घरून आणले जाते व बाळंतपणानंतर पुन्हा घरपोच सेवा दिली जाते.
  • - प्राथिमक आरोग्य केंद्रात दाखल अत्यवस्थ रुग्णास सिव्हिल हॉस्पीटलकडे हलविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरते.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या ॲम्ब्युलन्स गरोदर महिलांना सेवा देण्यासाठी उपयोगी पडतात. दुचाकी क्षयरोग विभागाकडे आहेत. कुष्ठरोग व आरोग्य केंद्राच्या सेवेसाठी अशा वाहनांची गरज आहे, त्याबाबत प्रस्ताव देणार आहोत.- डॉ. शीतलकुमार जाघव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य