शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापुरातील महिला सांगू लागल्यात, ‘झोपडपट्टीतील कचरा घंटागाडीत.. मात्र दुकानदारांचा कचरा रस्त्यावर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 3:48 PM

‘लोकमत’च्या चळवळीत सखींचा पुढाकार : ‘स्वच्छ सोलापूर’ला डाग लावणारे ‘कचराफेकू’ व्यावसायिक रडारवर

ठळक मुद्देसोलापूर ‘लोकमत’नं सोलापुरातील स्मार्ट सखींना आवाहन करताच अनेक जणी मोठ्या उत्साहानं पुढं सरसावल्यातशहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या नियमितपणे फिरत आहेत.

सोलापूर : ‘लोकमत’नं सोलापुरातील स्मार्ट सखींना आवाहन करताच अनेक जणी मोठ्या उत्साहानं पुढं सरसावल्यात. ‘यापुढे आपल्या परिसरात रस्त्यावर कचरा दिसल्यास फोटो काढून पाठवू,’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगू लागल्यात.  विशेष म्हणजे या महिलांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलं की झोपडपट्टीतील कचरा थेट घंटा गाडीत जातोय; मात्र बहुतांश हातगाडीवाले अन् दुकानदारच आपला कचरा रस्त्यावर टाकताहेत.

शहरातील कचरा संकलनासाठी महापालिकेच्या घंटागाड्या नियमितपणे फिरत आहेत. मनपा उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी पेठांमध्ये घंटागाड्यांच्या दोन फेºया होतात. नागरी वसाहतींप्रमाणे व्यापारी पेठांमधील कचरा कोंडाळी हटविण्यात आली आहेत. लोकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पण अनेक दुकानदार उघड्यावर कचरा टाकत आहेत. 

गोरगरीब माणसाला राहायला नीट जागा नसते. तरीही तो कचरा साठवून घंटागाडीत टाकण्याची सवय लावून घेत आहे. त्यांची मानसिकता बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र व्यापाºयांना ही सवय लावून घ्यायला काय अडचण आहे. घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घ्या, स्मार्ट सिटी अभियानात योगदान द्या, असे आवाहन त्यांनी  केले.

महापालिकेचे सफाई कर्मचारी अशा व्यापाºयांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे संकेतही दिले. 

चायनीज गाड्या, फेरीवालेही रडारवर- शहरातील चायनीज गाडीवाले, फेरीवाले या मंडळींचा मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित होतो. ही मंडळी शिल्लक मांस, अन्न आदी प्रकारचा कचरा उघड्यावर टाकतात. त्यातून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव होतो. ही कुत्री हिंस्त्र होऊन पुन्हा लहान मुले, महिलांवर हल्ले करतात. हत्तुरे वस्ती, आसरा चौक, गुरुनानक चौक, स्टेशन रोड, अशोक चौक परिसर, देगाव रोड, भारती विद्यापीठ परिसर, विजापूर रोड या भागातील चायनीज गाडीवाले, फळविक्रेते, फेरीवाले उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. 

तुमच्या परिसरात कचरा टाकला जातोय? मग काढा टाकणाºयाचा फोटो अन् पाठवा मेसेज!- सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ज्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाईल, त्या मोहिमेची सचित्र माहिती ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोलापूरकरांचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि सोलापूर शहर स्मार्ट व्हावं, यासाठी लोकमतनं पुढाकार घेतलाय.. तेव्हा महिलांनी आपल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याºयाचा लाईव्ह फोटो 9096880008 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेजद्वारे पाठवावा. चला तर मग.. उचला मोबाईल, काढा फोटो अन् पाठवा मेसेज.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान