शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा ध्येय नव्हतेच; आता संजयमामांनाच आमदार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:08 IST

कार्यकर्त्यांचा सूर : करमाळ्यात संजय शिंदे गटाची बैठक

ठळक मुद्देसंजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी केलाकरमाळ्यात विकासकामांच्या जोरावर संजयमामा शिंदे यांनी स्वत:चा गट निर्माण केलासंजयमामांना आमदार करणे हे आपले ध्येय आहे, असा सूर बैठकीत कार्यकर्त्यांनी लावला

करमाळा : संजयमामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी केला असून, संजयमामा हाच आपला पक्ष आहे. करमाळ्यात विकासकामांच्या जोरावर संजयमामा शिंदे यांनी स्वत:चा गट निर्माण केला असून, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी लोकसभा लढविणे हे मामांचे ध्येय नव्हतेच. संजयमामांना आमदार करणे हे आपले ध्येय आहे, असा सूर बैठकीत कार्यकर्त्यांनी लावला.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर संजयमामा श्ािंदे विधानसभा निवडणूक लढविणार का, असा प्रश्न करमाळ्यात शिंदे समर्थकांसह राजकीय वर्तुळात चर्चा आहे. झेडपीचे माजी सदस्य वामन बदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुनील सावंत, कन्हैय्यालाल देवी, चंद्रकांत सरडे, विलास राऊत, विलास पाटील, दत्ता जाधव, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, विवेक येवले, तात्या मस्कर, तानाजी झोळ, डॉ. गोरख गुळवे, सतीश शेळके, भास्कर भांगे, अभयसिंह राजेभोसले, राजेंद्र बारकुंड, तात्या सरडे, सतीश सूर्यवंशी, संजय सावंत, विनय ननवरे, उदय ढेरे, महादेव फंड, नीलेश कुटे, कैलास पाखरे, विकास गलांडे, गौतम ढाणे, शहाजी झिंजाडे, भोजराज सुरवसे, रेवणनाथ रोडगे, विनोद महानवर, युवराज गपाट, डॉ. सुभाष शेंद्रे, बबन मुरूमकर, विनोद जाधव, राजेंद्र बाबर, देविदास वाघ, सुभाष अभंग, अशपाक जमादार उपस्थित होते.

लोकसभेत मामांचा अविश्वास- लोकसभा निवडणूक लढविताना संजयमामा शिंदे यांनी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते. गेल्या साडेचार वर्षांपासून करमाळ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा शब्द आम्हाला मामांनी दिला होता. त्यानुसार आता विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह करण्यासाठी गटाचे ज्येष्ठ नेते वामन बदे यांच्या नेतृत्वाखाली संजयमामा शिंदे यांना दोन दिवसात निमगाव येथे भेटणार असल्याचे सुनील सावंत, चंद्रकांत सरडे, कन्हैय्यालाल देवी यांनी बैठकीत सांगितले.

बागल गटात चिंतालोकसभा निवडणुकीची संजयमामा शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बागल गटाने विधानसभा निवडणुकीत आपला मार्ग सुकर होईल, या दृष्टीने संजयमामा शिंदे यांचा प्रचार केला होता. पण मामांचा पराभव झाल्यानंतर आता शिंदे यांचे समर्थक संजयमामांनी विधानसभा लढवावी, असा आग्रह करू लागल्याने बागल गटातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. आता संजयमामा काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Electionनिवडणूक