शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

बँक आॅफ इंडियाच्या सोलापूरसह सहा जिल्ह्यातील २२ हजार शेतकºयांची १५९ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 11:39 IST

छ. शिवाजी महाराज सन्मान योजना : सात जिल्ह्यातील ८४ शाखांचे कर्जदार

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ११,६८८ शेतकºयांचा समावेशराज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या याद्या येणे सुरुचआतापर्यंत ९ ग्रीन लिस्ट

अरुण बारसकरसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून २२ हजार ४२८ शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीतून १५९ कोटी ४ लाख १ हजार ६१७ रुपये जमा झाले असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी दिली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११,६८८ शेतकºयांचा समावेश आहे.

सोलापूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सात जिल्ह्यांचा समावेश असून यामध्ये सोलापूर, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यात एकूण ८४ शाखा असून एकट्या सोलापूर जिल्ह्यात ५३ शाखा आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या याद्या येणे सुरुच असून आतापर्यंत ९ ग्रीन लिस्ट आल्या आहेत. मागील आठवड्यात बँक आॅफ इंडियाच्या सोलापूर विभागातील ३ हजार ४९८ शेतकºयांची ‘ग्रीन’ लिस्ट आली असून याची रक्कम २७ कोटी ९५ हजार ७४२ रुपये मिळाली आहे. कर्जमाफीची बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांना मिळालेल्या रकमेत सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ६८८ शेतकºयांना ७८ कोटी ८३ लाख ६७ हजार ३८० रुपयांचा फायदा झाला आहे. 

-----------------

नियमित कर्ज भरणाºयांना ८ कोटी 

  • - एकूण ९ लिस्टमध्ये थकबाकीदार (दीड लाखापर्यंत)  १६ हजार ९३९ शेतकºयांसाठी १३१ कोटी ६४ लाख ३२ हजार २६ रुपये बँकेला आले असून ही रक्कम बँकेलाच मिळाली आहे.
  • - नियमित कर्ज भरणाºया ३६३७ शेतकºयांना प्रोत्साहनचे ७ कोटी ८४ लाख ६५ हजार ९३१ रुपये मिळाले असून ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
  • - एकरकमी परतफेड योजना(ओ.टी.एस.) योजनेत दीड लाखावरील रक्कम भरणाºया १८५२ शेतकºयांना १९ कोटी ५५ लाख ३ हजार ६५९ रुपये मिळाले आहेत. 

----------कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी व रक्कम- बीड जिल्हा- १२७८ शेतकरी, ७ कोटी ५ लाख ९९ हजार ८७० रुपये.- हिंगोली जिल्हा- १८५८ शेतकरी, ११ कोटी ६९ लाख १९ हजार ४३५ रुपये.- लातूर जिल्हा- ७८५ शेतकरी, ७ कोटी ८ लाख ४३ हजार २१४ रुपये.- नांदेड जिल्हा- ४८६३ शेतकरी, ३७ कोटी ३१ लाख १४ हजार ९०६ रुपये.- उस्मानाबाद जिल्हा- १५३६ शेतकरी, १४ कोटी ४० लाख ३० हजार २६८ रुपये.- परभणी जिल्हा- ४२० शेतकरी, दोन कोटी ६५ लाख २६ हजार ५४४ रुपये. - सोलापूर जिल्हा- ११ हजार ६८८ शेतकरी, ७८ कोटी ८३ लाख ६७ हजार ३८० रुपये. 

अधिकाधिक शेतकºयांना कर्ज देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दीड लाखावरील रक्कम भरुन शेतकºयांनी तत्काळ कर्जमुक्त व्हावे. गरजेनुसार नव्याने कर्ज दिले जाईल.- प्रदीप कांबळेविभागीय व्यवस्थापक

टॅग्स :SolapurसोलापूरBank of Indiaबँक ऑफ इंडिया