शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

राजस्थान, गुजरातमधून आलेल्या गीर गायीं सोलापूरच्या जनावर बाजारात

By appasaheb.patil | Updated: January 18, 2020 14:07 IST

गवळार, जाफराबादी म्हशी विक्रीसाठी दाखल; चारा भरपूर असल्याने खरेदीचे प्रमाणही अधिक

ठळक मुद्देयंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झालीयंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे१० हजारांपासून चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत

सुजल पाटील

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सोलापूर-विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़  यात खिलार गायी-बैलांसह मुरा, खोंड, गीर गाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत आहे़ या बाजारात राजस्थान, गुजरातमधील गीर या गावच्या गीर गायींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील १० ते २० एकरात जनावरांचा बाजार भरविण्यात आलेला आहे़  मागील वर्षीपेक्षा यंदाच्या जनावरांच्या बाजारास नागरिक, शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाचा जनावरांचा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. या बाजारात १० हजारांपासून अडीच ते चार लाखांपर्यंतची जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़  मागील वर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.

या पावसामुळे चाºयाचा प्रश्न मिटला आहे़  यामुळे दूध देणाºया म्हशी, गायी यांच्या विक्रीचे प्रमाण कमी आहे़  मात्र ज्या गायी, म्हशी बाजारात दाखल झालेल्या आहेत त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत़ शिवाय खरेदीचे प्रमाणही अधिक आहे. म्हशीची १५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत विक्री होत आहे़  यात जाफराबादी, मुर्रा जातीच्या म्हशीची किंमत ५० हजार ते सव्वा लाखापर्यंत आहे़  यंदा बाजारात मंदिर समितीच्यावतीने पाण्यासह शेतकºयांसाठी लागणाºया सर्व सेवासुविधा पुरविण्यात आल्याची माहिती चिदानंद वनारोटे यांनी दिली़ 

कर्नाटक, मराठवाड्यातील जनावरे बाजारात...- हा बाजार रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर ते मोदी रेल्वे बोगद्यापर्यंत भरलेला आहे. कर्नाटक, मराठवाडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच विविध भागातील शेतकºयांनी जनावरे विक्रीस आणली आहेत. यंदाच्या जनावरांच्या बाजारात विविध प्रकारचे बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय, म्हशीमध्ये-पंढरपुरी म्हशी, गेरू म्हैस, जाफराबादी म्हैस, मुर्रा जातीच्या म्हैशी विक्रीसाठी आहेत़ गीर गाय ही साधारणत: १२ लिटर दूध देते़  या म्हशीची अंदाजे किंमत १० हजारांपासून सव्वा लाखांपर्यंत आहे़  जाफराबादी म्हशीसह गीर गायीला, म्हशीला बाजारात मोठी मागणी आहे तसेच विविध प्रकारची जनावरे विक्रीस आली आहेत़

यंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत़  यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे़  बाजारात विविध जातींचे बैल, म्हशी दाखल झाल्या आहेत़  १० हजारांपासून चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत़- आबासाहेब सुतार, शेतकरी

यंदा रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोर भरविण्यात आलेल्या जनावर बाजारात मंदिर समितीच्या वतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़  बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय विक्रीसाठी दाखल झालेली आहेत़  यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ - सुरेश पवार, शेतकरी

पोलीसांचा चोख बंदोबस्त...- जनावरांच्या बाजारात जनावरास काही इजा झाल्यास दवाखान्याची सोय आहे. त्याचबरोबर आलेल्या शेतकºयांसाठी चहा-पाणीसाठी हॉटेल, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स याठिकाणी आहेत़  जनावरांसाठी पाण्याबरोबर चाºयाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे़  सकाळी सहापासून ते रात्री उशिरापर्यंत जनावरांचा बाजार सुरूच असतो. याठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा