शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन आले धोक्यात; ग्रामीण भागातील जनावरांना होतेय लंपीची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 12:18 IST

पशुधन विकास अधिकाºयांच्या अभावाने बळीराजा हतबल; पशुधन वाचविण्याचे मोठे संकट

ठळक मुद्देलंपी रोगाची उत्पत्ती चावणाºया माशापासून होते. हे विषाणूजन्य रोग असले तरी उपचाराने कमी होणार आहेलागण झालेल्या जनावरांच्या अंगावर धबडे, पुरळ, ताप येणे व चारा न खाणे अशी लक्षणे असतात

बºहाणपूर : अक्कलकोट तालुक्यात लंपी हा विषाणूजन्य रोग जलदगतीने पसरत आहे़ अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकºयांसमोर पशुधन वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाच्या तयारीला लागण्याअगोदर पशुधनावर प्रादुर्भाव वाढला असून, शेतकरी हतबल झाला आहे़ त्यातच पशुधन विकास अधिकारी, पशुधन संवर्धन पर्यवेक्षकाच्या अभावाची भर पडली आहे.

एकीकडे सतत पडणाºया पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे़ बळीराजाने खरीप पिकांची रास करून रब्बी हंगामासाठी पूर्वमशागत चालू केली आहे़ या काळात अचानकपणे जनावरांच्या अंगावर फोड येऊन त्याला छिदं्र पडतात़ या फोडामधून जीवाणू बाहेर पडत आहेत़ पावसाळ्याच्या दिवसात माशी, किडे चावा घेतात़ यातून हे फोड फु टतात़ त्यामुळे या आजाराकडे सुरुवातीला शेतकºयांचे दुर्लक्ष झाले़ या लंपी आजारावर औषध, लस नसल्यामुळे अँटिबायोटिक देऊन रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे डॉक्टर संतोष कारळे यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात ७३० गाई, म्हशी वर्गातील ३७० अशा एकूण ११०० जनावरांना लंपीची लागण झाली आहे़ त्यांच्यावर लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने एकूण ५६ हजार ५०० लसी जिल्हा परिषद पशु आरोग्य विभागाकडे उपलब्ध केल्या आहेत.

१२ गावांमध्ये पसरला लंपीबºहाणपूर, चपळगाव, कुरनूर, हन्नूर, किणी, दोड्याळ, जेऊर, करजगी, कोर्सेगाव, गळोरगी, दहिटणे, सलगर या गावांमधील जनावरांना लंपी या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. या जनावरांना जिल्हा परिषद पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून लसीकरण करून त्यांना विलगीकरण करण्यात येत आहे. परंतु तालुक्यात बहुतांश गावातील जनावरे पशुवैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या अभावामुळे तडफडत आहेत. 

लंपी रोगाची उत्पत्ती चावणाºया माशापासून होते. हे विषाणूजन्य रोग असले तरी उपचाराने कमी होणार आहे. लागण झालेल्या जनावरांच्या अंगावर धबडे, पुरळ, ताप येणे व चारा न खाणे अशी लक्षणे असतात. अशी लक्षणे आपल्या जनावरांमध्ये दिसल्यास पशुपालकांनी तत्काळ जवळील जिल्हा परिषद पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घ्यावेत. - तोलाराम राठोड,तालुका पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, अक्कलकोट.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद