शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट सुरू होणार

By appasaheb.patil | Updated: June 8, 2019 10:57 IST

सोलापुरातील विभागीय कार्यालयात बैठक : खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींची रेल्वे अधिकाºयांसोबत चर्चा

ठळक मुद्देखासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्यात बैठक आणखीन विकासकामे करण्यासाठी लवकरच खासदार व रेल्वेचे अधिकारी स्टेशन परिसराची पाहणी करू, असे बैठकीत ठरले.रेल्वे स्थानकाबाहेर वाढलेले अतिक्रमण व होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्याचे बैठकीत ठरले़

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात सुरू असलेले दुहेरीकरणाचे काम वेगाने करण्याबरोबरच सोलापूर स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट बसविण्यात येणार आहे. याबाबत खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्यात बैठक झाल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील अधिकाºयांची भेट घेऊन विविध विकासकामांची माहिती घेतली. यावेळी अप्पर रेल्वे मंडल प्रबंधक व्ही. के. नागर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार महास्वामी यांनी दुहेरीकरण, स्थानकावर प्रवाशांना पुरविण्यात येणाºया सेवासुविधा, सिद्धेश्वर एक्स्प्रेसला होणारा विलंब याबाबतची माहिती घेतली. आणखीन विकासकामे करण्यासाठी लवकरच खासदार व रेल्वेचे अधिकारी स्टेशन परिसराची पाहणी करू, असे बैठकीत ठरले.

दुहेरीकरण कामाचा घेतला आढावा- सोलापूर विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाबाबत खासदारांनी आढावा घेतला़ भिगवणपर्यंत दुहेरीकरणाचे काम रेल विकास निगम करीत आहे. भिगवण ते सोलापूर हे १६५ किलोमीटरचे अंतर आहे, त्यापैकी भिगवण ते वडसिंगे ९० किलोमीटरचे दुहेरीकरण काम अद्याप राहिले आहे़ त्यापैकी ३५ किलोमीटरचे काम पुढील दोन महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना सांगितली.

वाहतूक नियोजनासाठी दोन पोलिसांची नियुक्ती- रेल्वे स्थानकाबाहेर वाढलेले अतिक्रमण व होणारी वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्याचे बैठकीत ठरले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानकाबाहेर दोन वाहतूक पोलीस मागविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना दिली़ याशिवाय स्थानकाबाहेरील अतिक्रमण ही समस्यासुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवणे आवश्यक असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदारांना सांगितले़ 

कुर्डूवाडी उड्डाण पुलासाठी चार कोटींची मागणी- सोलापूर मंडलातील कुर्डूवाडी रेल्वे उड्डाण पुलासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रेल्वेला चार कोटी रुपये देणे आवश्यक आहे, याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून झाला आहे़ याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणी रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदार महास्वामी यांच्याकडे केली आहे़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे