शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:05 IST

केंद्र शासनाची योजनेत सोलापूरचा समावेश, उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे- पाटील यांनी दिली माहिती

ठळक मुद्देया सर्वेक्षणाचा अहवाल पुस्तिेकच्या स्वरूपात केेंद्र शासनाला सादर होणार २१ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता विविध खात्यांतील अधिकाºयांची बैठक

सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनेद्वारे सोलापुरातील जीवनशैली निर्देशांक तपासण्यात येणार आहे. राज्यातील २७ महापालिकांपैकी १८ महापालिकांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, त्यात सोलापूरचाही समावेश असल्याची माहिती उपआयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

जीवनशैली निर्देशांकामध्ये शहराची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षितता, अर्थव्यवस्था, रोजगार संधी, सार्वजनिक मैदाने, जमिनींचा वापर, ऊर्जा पुरवठा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन,प्रदूषण अशा १५ महत्त्वांच्या मुद्यांवर तपासणी करून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांच्या जीवनशैलीशी निगडीत मनपाच्या १८ विभागांतील माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त केलेली कोअर कमिटी महत्त्वाच्या व कमी महत्त्वाच्या अशा ८ मुद्द्यांवर शहराची पाहणी करणार आहे. याबाबत अहवाल तयार एप्रिलअखेर केंद्र शासनाला सादर करावयाचा आहे. 

जीवनशैली निर्देशांकाची तपासणी करण्यासाठी २१ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता विविध खात्यांतील अधिकाºयांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये वीज कंपनी, सिंचन, प्रदूषण महामंडळ, परिवहन, राज्य विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त, बांधकाम खात्याचे अधिकारी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आदी या बैठकीला हजर राहणार आहेत़ योजनेत असलेल्या १८ शहरांपैकी कोणते शहर कोणत्या गोष्टींसाठी अग्रेसर राहील हे या सर्वेक्षणातून दिसणार आहे.

या सर्वेक्षणाचा अहवाल पुस्तिेकच्या स्वरूपात केेंद्र शासनाला सादर होणार आहे. केंद्र शासन प्रत्येक शहराकडून आलेल्या अहवालावरून कोणत्या शहरासाठी काय आवश्यक असेल त्याप्रमाणे निधी व योजना देण्याबाबत काम करणार आहे. 

जीवनशैली निर्देशांक तपासून योजना तयार करण्यासाठी देशातील ११६ शहरे निवडण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील १८ शहरे आहेत. निवड झालेली शहरे १० लाख लोकसंख्येपुढील आहेत. यातून त्या-त्या शहरांची जीवनशैली कशी आहे, हे स्पष्ट होणार असल्याने शासनाला योजना राबविताना उपयोग होणार आहे.- त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त मनपा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाgovernment schemeसरकारी योजना