शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रात्री शेतात पाणी देताना जीव धोक्यात; तीन शेतकऱ्यांच्या पायास डसला साप!

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 25, 2023 17:05 IST

या घटना दक्षिण तालुक्यातील हणमगांव, उत्तर तालुक्यातील कवठे तर तुळजापूर तालुक्यातील गंगेवाडी या तीन गावात घटना घडल्या आहेत. 

सोलापूर : रात्री शेतात पाणी देताना व काम करीत असताना वेगवेगळ्या घटनेत तीन शेतकऱ्यांच्या पायास सापाने चावा घेतला आहे. या घटना दक्षिण तालुक्यातील हणमगांव, उत्तर तालुक्यातील कवठे तर तुळजापूर तालुक्यातील गंगेवाडी या तीन गावात घटना घडल्या आहेत. 

राजू गोविंद राठोड (वय ४०, रा. कवठे, ता. उ. सोलापूर), दस्तगीर मताब शेख (वय ३०, रा. हणमगांव, ता. द. सोलापूर), अजय अंबादास कांबळे (वय ३६, रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे सर्पदंश झालेल्या तीन शेतकर्यांची नावे आहेत. सध्या ग्रामीण भागात शेतीसाठी रात्रीची वेळ आहे, त्यामुळे बरेच शेतकरी रात्रीच्या सुमारास पाणी देण्याचे काम करतात. शिवाय शेतात दिवसा काम करीत असताना गवतात पाय गेल्यावर अनेकांना सर्पदंश झाल्याच्याही घटना ताज्या आहेत. राजू राठोड हे गोविंद तांडा येथील शेतात काम करीत असताना डाव्या पायास साप चावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भाऊजी नीलकंठ रजपूत यांनी दाखल केले. 

दस्तगीर मताब शेख (वय ३०, रा. हणमगांव, ता. द. सोलापूर) शेतात काम करीत असता उजव्या हातास साप चावला. त्याना भाऊ गैबीपीर शेख याने उपचारासाठी दाखल केले. तर अजय अंबादास कांबळे (वय ३६, रा. कर्णिक नगर, सोलापूर) यास गंगेवाडी येथील शेतात काम करीत असताना डाव्या पायास साप चावल्याने हर्षिल अहीरे याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. या तीनही घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर