शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लेटरपॅडचा दुरुपयोग केला, सांगोल्याच्या माजी नगराध्यक्षांना नोटीस

By रवींद्र देशमुख | Updated: November 19, 2023 17:17 IST

नोटीस बजावल्याने सांगोल्यात शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सोलापूर : सध्या कोणत्याही पदावर नसताना नगरपरिषदेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरपॅडचा नगरपरिषद व इतर प्रशासकीय कार्यालयात गैरवापर केल्याने सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना नोटीस बजावली आहे. येत्या तीन दिवसात त्यांनी खुलासा मागितला आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्षाला थेट नोटीस बजावल्याने सांगोल्यात शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी नगरपरिषद व वरिष्ठ कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करण्यासाठी सध्या नगरपरिषदेच्या कोणत्याही पदावर नसताना त्यांनी त्यांचे नावापुढे नगराध्यक्ष व नगर पालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटर पॅडचा वापरून विविध तारखांना पत्रव्यवहार केला आहे.  याबाबत त्यांनी तीन दिवसाच्या आत खुलासा करावा अशा प्रकारची नोटीस मुख्याधिका-यानी बजावल्याने चर्चेला उधान आले आहे. दरम्यान या नोटिशीची प्रत माहितीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिली पाठविली आहे. मी माझ्या लेटर पॅडचा कसलाही गैरवापर केला नाही. जनतेच्या हिताच्या कामासाठीच लेटर पॅडचा वापर केला आहे. माझ्या कार्यकाळात नगराध्यक्ष असतानाचे लेटर पॅड शिल्लक होते. शक्यतो मी प्रत्येक लेटरवर 'माजी' असे हाताने लिहीत असतो. अनावधानाने एखाद्या लेटर वरती नजर चुकीने 'माजी' असे लिहावयाचे राहिले असल्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नोटीसिला मी रितसर उत्तर देणार आहे. - नवनाथ पवार, माजी नगराध्यक्ष, सांगोला

टॅग्स :Solapurसोलापूर