शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाच्या धर्तीवर मदतीसाठी ‘दूध’ संस्थाचालकांचे पोलिसांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 16:36 IST

शेतकरी संघटना : नुकसानीची संस्थाचालकांना भीती

ठळक मुद्देदूध संस्थाचालकांच्या बैठकाही पोलिसांनी घेतल्याथेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलेहे नुकसान परवडणारे नाही. - आ. प्रशांत परिचारक

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धर्तीवर पोलिसांची मदत घेत गावपातळीवरील संकलित झालेले दूध गोळा करण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी शेतकºयांकडून घेतलेले दूध विक्रीअगोदरच आंदोलकांनी सांडून टाकले तर त्याचे नुकसान कोण देणार, अशी भीती संस्थाचालकांमधून व्यक्त केली जात आहे.

१६ जुलैपासून राज्यात शेतकºयांना थेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले असून त्यासाठी जिल्हा दुग्धविकास अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना पत्र देऊन पोलीस संरक्षण देण्याची माणगी केली आहे. याशिवाय तालुका स्तरावर शेतकरी संघटना व दूध संस्थाचालकांच्या बैठकाही पोलिसांनी घेतल्या आहेत.

सर्वच ठिकाणी पोलीस पोहोचू शकणार नाहीत, तुमच्या जबाबदारीवर दूध संकलन करण्याबाबच्या सूचना पोलिसांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले. एखाद्या गावातील संस्थेचे दूध गोळा केले व ते दूध डॉकपर्यंत येण्याअगोदरच आंदोलकांनी सांडले तर त्याचे होणारे नुकसान सोसणार कोण?, असा प्रश्न संस्था चालकांनीच उपस्थित केला आहे. त्यामुळे गावपातळीवरच्या संस्थांपुढेही दूध गोळा करावे की नको?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष महामूद पटेल व पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी आंदोलन करणार असल्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे.

जिल्ह्यात १२ लाख लिटर दूध- सोलापूर जिल्ह्यात खासगी दूध संघ १० लाख लिटर व सहकारी संघ दोन लाख लिटर असे १२ लाख लिटर दूध संकलित करतात. जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यातील शेतकºयांकडून संकलित झालेले दूध खासगी व सहकारी संस्था वाहतूक करून डॉकपर्यंत पोहोच करतात. अनेक मार्गांवरून वाहतूक होणाºया दुधाच्या वाहनांना कसे संरक्षण द्यायचे, हा पोलिसांचा तर नुकसान सहन कोण करायचे हा संस्थांचा प्रश्न आहे. 

मागील आंदोलनात दूध वाहक वाहनांची तोडफोड करून आंदोलकांनी दूध सांडल्याने संस्थांचे नुकसान झाले होते. शेतकºयांनी संस्थेला दूध घातले म्हणजे शेतकºयांना दुधाचे पैसे देण्याची जबाबदारी संस्थेची आहे. हे नुकसान परवडणारे नाही.- आ. प्रशांत परिचारक, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना