शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतियांचा टाहो; हमे जाने दो साब... बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:33 IST

मोडनिंंबच्या निवारा केंद्रातील लोकांचा मातृभूमीकडे ओढा; आप्तांच्या आठवणीने सारेच व्याकूळ

ठळक मुद्दे- पुण्यात कुटुंबासोबत राहून दहावीचे शिक्षण घेत आई-वडिलांना हातभार लावणारा प्रवीण राठोड हा प्रसारमाध्यमांपुढे येताच त्याचे डोळे डबडबलेमोडनिंब येथील निवारा केंद्रात अडकलेल्या परप्रांतीयांच्या आहारासाठी सरपंच दत्तात्रय सुर्वे आणि त्यांचे शिष्टमंडळ कामाला लागले

मारुती वाघ 

मोडनिंब : कुछ भी करो़़़ हम अपने घर जाना चाहते है... हम और कितने दिन तक यहा रुकानेवाले... कब खुलेगा यहां का लॉकडाउऩ़़ हमारे बच्चे, माँ-बाप हमारी राह देख रहे है़...हमे जाने दो’ असा आर्त टाहो फोडताहेत मोडनिंब येथील शेल्टर होममधील परप्रांतीय.

९ एप्रिल रोजी अलिबाग, पुणे, मुंबई या भागातील अनेक नागरिक कोरोनाच्या भीतीने ‘नको ते पुणे़़़ आपल्याला नको ती मुंबई़़़ आपला गावच बरा’ म्हणत गावचा रस्ता धरला़ परराज्यातील जवळपास ७५ नागरिक पायी चालत तेलंगणाकडे निघाले होत़े  यांच्यापैकी काही जण दुचाकीवरून निघाले़ यांच्यापैकी काही जणांनी आपलं गाव गाठलं़ पायी प्रवास करत निघालेले पोलिसांच्या तावडीत सापडले.

दरम्यान, पोलिसांनी मोडनिंब येथे सुरू केलेल्या शेल्टर होममध्ये आणून दाखल केले़ आज १३ दिवसांनंतरही हे लोक उमा विद्यालयाच्या आवारातच अडकून पडले आहेत़ मोडनिंब ग्रामपंचायतीने या सर्वांना राहण्याची, दोन वेळच्या जेवण्याची आणि चहा-नाष्टा आणि अरोग्याची सुविधा दिली आहे. येथे सोयीसुविधा असल्यातरी या लोकांचे येथे कशातच मन लागत नाही़ साºयांची ओढ आपल्या गावाकडील कुटुंबाकडे लागून राहिली आहे़

सरपंचांच्या शिष्टमंडळाची धावपळ - मोडनिंब येथील निवारा केंद्रात अडकलेल्या परप्रांतीयांच्या आहारासाठी सरपंच दत्तात्रय सुर्वे आणि त्यांचे शिष्टमंडळ कामाला लागले आहे़ सकाळी नाष्टा, दोन वेळा चहा, आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या़ त्यांचे सर्व स्वयंसेवक दररोज या लोकांची सेवा करीत आहेत़

अन् प्रवीणचे डोळे डबडबले- पुण्यात कुटुंबासोबत राहून दहावीचे शिक्षण घेत आई-वडिलांना हातभार लावणारा प्रवीण राठोड हा प्रसारमाध्यमांपुढे येताच त्याचे डोळे डबडबले़ तो म्हणाला, पुण्यात आई-वडील दिवसभर बिगारी काम करतात़ त्यांच्या हाताखाली काम करत दहावीचे शिक्षण घेतोय़ माझे पुढील शिक्षण चालू आहे़ एसटी बस बंद झाल्यामुळे आम्ही सारे जण दुचाकीवरून तेलंगणाकडे निघालो होतो़ आई-वडील एका मोटरसायकलवर होते अन् मी माझ्या काकासोबत मोटरसायकलवर बसून निघालो होतो़ आई-वडील पुढे गेले अन् मी व काका पोलिसांच्या हाती लागलो़ मला सोडा.. माझ्या आई-वडिलांना भेटायला जाऊ द्या म्हणत त्याने टाहो फोडला.

निखळलेला हात घेऊन बसवा अडकला शेल्टर हाऊसमध्ये - पुण्यामध्ये एका कंपनीत वॉचमनचे काम करणारा बसवा पुजारी याचा डावा हात काही दिवसांपूर्वी निखळला़ यामुळे वॉचमनचे काम करणारा बसवा ही जखम घेऊन गुजराण करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि लॉकडाउन झाला़ उपाशीपोटी राहण्यापेक्षा अशी जखम घेऊन एका हाताने साºया जबाबदाºया पार पाडणाºया बसवांना परतीच्या प्रवासात मोडनिंब येथे पोलिसांनी रोखले़

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस