शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात पन्नास हजार तरुणांनी फिरविली मतदार नोंदणीकडे पाठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 14:27 IST

सोलापूर/ पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी मोहीम राबवूनही पुणे विभागातील अवघ्या ३० टक्के युवकांची नावे ...

सोलापूर/ पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी मोहीम राबवूनही पुणे विभागातील अवघ्या ३० टक्के युवकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यातही पुणे जिल्हा त्यात पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

सांगलीमध्ये तुलनेने युवा मतदारांची नोदणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात १ लाख ८ हजार मतदार नोंदणी अपेक्षित होती. यापैकी ४६ हजार ३५७ जणांनीच नोंदणी केली आहे. यामुळे जवळपास ५० हजार नव्या मतदारांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इतकेच काय तर मतदार नोंदणीसाठी वयाचा आणि रहिवासी पुरावाच आवश्यक केला आहे. छायाचित्र असलेले ओळखपत्र नसले तरी चालणार आहे. विशेष मतदारनोंदणी मोहीम घेऊन नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी दिली जात आहे. तर, १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया मतदारांसाठी शालेय वर्षाच्या सुरुवातीस महाविद्यालयात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. 

निवडणूकआयोगाकडून करण्यात येणाºया प्रयत्नानंतरही पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पुणे विभागातील १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांनी फारसा उत्साह दाखविलेला नाही. लोकसंख्यावाढीच्या निकषाच्या आधारे पुणे विभागामध्ये १८ ते १९ वयोगटातील ८ लाख २२ हजार ६३३ युवक आणि युवती असतील. त्या पैकी अवघ्या २ लाख ५३ हजार १९६ जणांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख युवा मतदार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्या पैकी अवघ्या ५४ हजार ११५ युवा मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत. 

शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबईसारखी महानगरे अथवा शहरांकडे धाव घेतात. त्यामुळे या वयोगटातील युवकांचे मतदार नोंदणीचे प्रमाण तुलनेने कमी दिसत असल्याचे विभागीय आयुक्तालय प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी करावी अथवा विशेष मतदार मोहिमेत अर्ज करावा.  त्यांचा अर्ज मूळ मतदारसंघात पाठविण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

जिल्हानिहाय १८-१९ वयोगटातील मतदारांची स्थितीजिल्हा    १८-१९ वयोगटातील     प्रत्यक्ष नोंदणी                   अपेक्षित मतदार     झालेले मतदारपुणे                   ३,५४,४२९        ५४,११५सातारा              १,१९,१२६        ४१,५५६सांगली              ८५,१८१        ५४,८६३सोलापूर           १,०८,७४७        ४६,३५७कोल्हापूर           १,५५,१५०        ५६,३०५    

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण