शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अन् जिल्हा आरोग्य अधिकारी झाले ग्रुपमधून लेफ्ट; आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यामुळे आरोग्य खात्याची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 09:40 IST

५० कर्मचारी अन् ५ पीपीई किट दिले; साहित्य खरेदीवरून सुरू आहे वाद

ठळक मुद्देराज्याचे आरोग्य मंत्री सोलापूर दौऱ्यावरकोरोना संदर्भात घेणार आढावा बैठक

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे शनिवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हे आरोग्य विभागाच्या ग्रुपमधून लेफ्ट (बाहेर पडल्यामुळे) जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या २६६ पॉझिटिव्ह रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३१ उपकेंद्र कार्यरत आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या केंद्रात काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य व औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटीचा निधी दिला. या निधीतून साहित्य खरेदीची प्रक्रिया लांबविण्यात आली. लोकप्रतिनिधीनी ओरड केल्यानंतर ४ जून रोजी मक्तेदार ठरवून वर्कऑर्डर देण्यात आल्या व त्यानंतर सर्व आरोग्य केंद्रांना साहित्य पोहोच केल्याचे जाहीर करण्यात आले. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, आरोग्य केंद्रात कर्मचारी ५० आणि साहित्य पोहोचले पाच अशी परिस्थिती आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या दौर्‍याच्या तयारीसाठी त्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर आरोग्य विभागाच्या ग्रुपमधून ते लेफ्ट झाले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत वेगवेगळी चर्चा रंगली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरRajesh Topeराजेश टोपेMedicalवैद्यकीय