शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; कोणत्या कारणामुळे पडणार दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:24 IST

बैठकही झाली रद्द; इच्छुकांच्या डावपेचांमुळे श्रेष्ठीही धास्तावले

ठळक मुद्देसुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे अनगर येथील बैठक रद्द केलीअध्यक्षपदासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राजेंद्रसिंह राजेभोसले आणि दीपक माळी यांची नावे चर्चेत अध्यक्ष निवडीवरूनही संचालकात एकमत नाही. त्यामुळे अध्यक्ष निवड लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न

सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते कारखान्यावर श्रेष्ठींची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न संचालक करीत असले तरी इच्छुकांच्या डावपेचांमुळे खबरदारी घेतली जात आहे.

दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राजेंद्रसिंह राजेभोसले आणि दीपक माळी यांची नावे चर्चेत आहेत. संचालकांशी चर्चा करण्यासाठी लोकनेते कारखान्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती.

सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीवरूनही संचालकात एकमत नाही. त्यामुळे अध्यक्ष निवड लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न श्रेष्ठी करीत आहेत. शुक्रवारी यासंदर्भात पत्र देण्याचा विचारही सुरू आहे. यादरम्यान, संघाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नेत्यांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. या इच्छुक संचालकाने अध्यक्षपदासाठी सूचक आणि अनुमोदकासह अर्ज भरल्यास सर्वांची पंचाईत होईल. श्रेष्ठींनी विशेष काळजी घ्यायची ठरवल्याचेही सांगण्यात आले. 

सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे अनगर येथील बैठक रद्द केली आहे. परंतु, शुक्रवारी श्रेष्ठी नेते दूध संघात येतील. ही निवड लांबणीवर जावी, यासाठी प्रयत्न करतील. संचालकांचा कानोसाही त्याच दिवशी घेतला जाईल.- राजन पाटील, माजी आमदार.

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाPoliticsराजकारण