शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; कोणत्या कारणामुळे थांबली ‘आरटीओ’ विभागातील भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:37 IST

सोलापूरला ४९ जागा मंजूर; मोटार सहायक निरीक्षक, निरीक्षकाच्या १२ जागा रिक्त

ठळक मुद्देसोलापूर उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अख्त्यारीतकार्यालयासाठी अनेक पदे मंजूर आहेत. मोटार वाहन सहायक निरीक्षक आणि निरीक्षकांच्या ४९ जागा मंजूर जिल्ह्यात सर्वप्रकारच्या जवळपास १५ लाख वाहनांची नोंदणी

सोलापूर : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अनेक अडचणींचा सामना करीत आहे़ कार्यालयासाठी अनेक पदे मंजूर आहेत. मोटार वाहन सहायक निरीक्षक आणि निरीक्षकांच्या ४९ जागा मंजूर असून, उलटपक्षी १२ जागा रिक्त आहेत़ जिल्ह्यात सर्वप्रकारच्या जवळपास १५ लाख वाहनांची नोंदणी असून, त्यांचे फिटनेस, परवाने आदी कामे कोरोना काळात १५ टक्के मनुष्यबळावर होत आहे़ मात्र, प्रत्यक्ष भरतीला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.

येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अख्त्यारीत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मदतीला दोन सहायक परिवहन अधिकारी आहेत. मोटार वाहन निरीक्षकांना नवीन वाहनांची नोंदणी, कच्चे-पक्के  लायसन्स, चाचणी वाहन योग्यता प्रमाणपत्र, वाहन हस्तांतरणाची कागदपत्रे तपासणी कामे करावी लागतात़ या वाहन निरीक्षकांच्या मदतीसाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत.

पूर्वी वाहन तपासणीकरिता वाहन संख्येचे बंधन नसल्याने आलेल्या वाहनांकडून शुल्क भरून घेऊन योग्यता प्रमाणपत्र देत होते़ असाच प्रकार लायसन्सबाबतीत सुरू होता़ या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली़ यावर न्यायालयाने एका मोटार वाहन निरीक्षकाने त्याच्या कार्यालयीन वेळेत किती वाहने तपासावीत, लायसन्स देण्यास ठराविक संख्या निश्चित केली़ सरकारने याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले़ सुरुवातीला याकडे दुर्लक्ष झाले़ सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल झाली़ काम न करणारे अनेक मोटार वाहन निरीक्षक न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित झाले़ आदेशानुसार एक मोटार वाहन निरीक्षक दिवसाकाठी फक्त २५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र, ३० जणांची चाचणी घेऊन पक्के  लायसन्स देऊ शकतो.

सोलापुरात १५ लाखांहून अधिक वाहनांची नोंदणीसहायक परिवहन अधिकाºयाची एक जागा वर्षभरापासून रिक्त आहे़ मोटार वाहन निरीक्षकाची २३ पदे मंजूर असून सहा पदे रिक्त आहेत़ १७ मोटार वाहन निरीक्षकांपैकी सध्या पाच निरीक्षक हे चेकपोस्टवर चक्र ाकार पद्धतीने कार्यरत आहेत़ दोन मोटार वाहन निरीक्षक हे भरारी पथकात तर दोन निरीक्षक शिबिरांसाठी आहेत़ सहायक निरीक्षकांच्या २६ जागा रिक्त आहेत तर सहा जागा रिक्त आहेत़ 

दिवसभरात शंभर वाहनांचे नूतनीकरण होते़ वेटिंग पिरीयड तीन महिन्यांच्या पुढे गेला आहे़ वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसणाºया वाहनांकडून अपघात झाल्यास नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी घेत नाही़ प्रतिक्षा कालवाधीमुळे विनालायसन्स वाहन चालविणाºयांची संख्या वाढू शकते़ निरीक्षकांच्या भरतीबाबत चार दिवसांपूर्वी आदेश निघाले आहेत. त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी़ - विजय इंगवलेसेक्रेटरी, राजपत्रित अधिकारी, मोटार वाहन संघटना

एकूण १५ लाख वाहनांपैकी ट्रान्स्पोर्ट अंतर्गत दोन लाख वाहने नोंदीत आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी योग्यता प्रमाणपत्र घेणे सक्तीचे आहे़ मोटार वाहन निरीक्षकांची संख्या, रविवार- शनिवार, इतर शासकीय सुट्या लक्षात घेता वर्षभरात सरासरी २४० दिवसांचे कामकाज होते़ -उदयशंकर चाकोते अध्यक्ष, मोटार मालक संघ

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसjobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या