शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; यंदा सोलापूर जिल्ह्यात किती हेक्टरवर होणार खरीपाची पेरणी

By appasaheb.patil | Updated: May 4, 2020 13:21 IST

अन्नधान्याच्या उत्पादनवाढीचेही ठेवले उद्दीष्टय; सोलापूर कृषी विभागाची माहिती

ठळक मुद्देजिल्ह्यात दोन लाख 82 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजनगळित धान्याचे 44511 मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले 2,11,390 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर पैकी एप्रिल महिन्यात 20655 मेट्रीक टन खत उपलब्ध

सोलापूर : खरीप हंगाम 2020 साठी सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 82 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्या बैठकीत खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याचे श्री. बिराजदार यांनी सांगितले.

खरीपाच्या पीक पेरणीच्या नियोजनाबरोबरच अन्नधान्य उत्पादनाचेही उद्दीष्टय निश्चित  करण्यात आले आहे. तृणधान्याचे 56816 मेट्रीक टन कडधान्याचे 76955 मेट्रीक टन असे अन्नधान्याचे एकूण 133771 मेट्रीक टनाचे उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे. गळित धान्याचे 44511 मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे.

सन 2015 मध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे आणि त्यावर्षी उजनी धरणातील पाणी  पातळी खालावल्याने जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी  2016 च्या खरीप हंगामात ऊसाऐवजी तूर, उडीद, मका, सोयाबीनची पेरणी केली. पीक पध्दतीत झालेल्या बदलाचा शेतक-यांना फायदा झाला. तेव्हापासून खरीप हंगामात तूर, उडीद, मका आणि सोयाबीन खालील पेरणीत वाढ होत आहे.    2019-20 मध्ये ऊसाखालील लागवडीचे सरासरी क्षेत्र 1,65,800 हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत 62108 हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे, असे बिराजदार यांनी सांगितले.

जमीन आरोग्य पत्रिका अभियान राबविणार यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ५५ गावांतील ५३५६६ खातेदारांचे मृदा नमुने काढण्याचे नियोजन केले असल्याचेही बिराजदार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बियाणांचे झालेले नियोजन  खरीप हंगाम 2020 साली 31,973 क्विंटल बियाण्याचे नियोजन आहे. पैकी 1080 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

रासायनिक खतांचे नियोजन या हंगामासाठी 2,11,390 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. पैकी एप्रिल महिन्यात 20655 मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे. खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात 1,33,451 मेट्रीक टन विक्री झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक मागणी युरिया खताला असते, असे  बिराजदार यांनी सांगितले. 

 -------------------पिकवार खरीप नियोजन - बाजरी - 50 हजार हेक्टर, मका   - 29 हजार हेक्टर, तूर -  86800 हेक्टर , उडीद  -  36000 हेक्टर, मूग - 20000 हेक्टर, सूर्यफूल - 9000 हेक्टर, सोयाबीन - 46500 हेक्टर , ऊस  - 1,25,000 हेक्टर.

 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी