शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनगौरव पुरस्कारासाठी सोलापुरात आलेल्या राजा ढालेंची भेट ठरली शेवटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:24 IST

चळवळ पोरखी झाली; शहर-जिल्ह्यात वाहण्यात आली श्रद्धांजली; चळवळींच्या आठवणीला उजाळा

ठळक मुद्देदलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झालाविचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले

संताजी शिंदे 

सोलापूर : दलितांचा मुक्तीलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साºया देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. अशी भूमिका मांडून २९ मे १९७२ रोजी स्थापन केलेल्या दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची एप्रिल २०१८ मधील सोलापूरची भेट शेवटची ठरली. सम्यक विचार मंचच्या वतीने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 

दलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येने तरुणांनी पँथरमध्ये प्रवेश केला. प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होतं. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले.

आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात राजा ढाले हे नेहमी येत होते. १९७४ साली सुभाष चौकात दलित पँथरच्या प्रचारासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य हे होते. यावेळी वक्ते म्हणून राजा ढाले व अरुण कांबळे हे उपस्थित होते. सुभाष चौकातील सभा चांगलीच गाजली होती.  सम्यक विचार मंचच्या वतीने एप्रिल २0१८ मध्ये आयोजित केलेल्या मिलिंद व्याख्यानमालेत त्यांनी ‘फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ: बहुजनांची पे्रेरणा’ या विषयावर व्याख्यान दिले होते. सत्ताधाºयांना राज्यघटना राबवायची नाही, विषमतावादी व्यवस्था आणायची आहे. असे जर झाले तर येणाºया काळात देशात ज्वालामुखी निर्माण होईल आणि त्याला कोणी रोखू शकणार नाही, असे परखड मत राजा ढाले यांनी व्यक्त केले होते. आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यासक असलेल्या राजा ढाले यांची सोलापूर भेट ही शेवटची ठरली. 

देशात अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, तेव्हा महाराष्ट्रात राजा ढाले, ज.वी. पवार, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली दलित पँथरची स्थापना झाली. राजा ढाले यांचा सोलापूरशी चांगला ऋणानुबंध होता. त्यांच्या जाण्याने धगधगत्या आंबेडकरी चळवळीतील नेता हरपला आहे. - राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, महाराष्ट्र राज्य. 

दलित पँथरच्या नेतृत्वासह एक थोर विचारवंत, वस्तुनिष्ठ लेखक, परखड आंबेडकरवाद मांडणारा बुद्धिवंत, कुशल संघटक, फरडा वक्ता आज आम्हाला सोडून गेला. दलित पँथरचे वैचारिक आक्रमक नेतृत्व आम्हाला सोडून गेल्याने आंबेडकरी चळवळ पोरखी झाली आहे. - राजाभाऊ इंगळेप्रदेश उपाध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी

पँथरमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही पक्षाचा शिक्का मारून घेतला नाही. राजा ढाले नावाची आंबेडकरी चळवळ त्यांनी उभी केली. वैचारिक बैठक असलेले राजा ढाले हे शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीशी निष्ठेने राहिले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - सुभानजी बनसोडेमाजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते

टॅग्स :Solapurसोलापूर