शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चिक्केहळ्ळी जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:39 IST

विद्यार्थ्यांनी केल्या तक्रारी; एकाही जबाबदार अधिकाºयांनी दिली नाही शाळेला भेट

ठळक मुद्देचिक्केहळ्ळीत जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत शाळेत शंभरहून अधिक पटसंख्या आहेखिचडीसाठी तांदूळ  काढला गेला. त्यामध्ये अळ्या असल्याचे स्वयंपाकी महिला शीला बंदीछोडे आणि शोभा झळके यांच्या लक्षात आले

अक्कलकोट : तालुक्यातील चिक्केहळ्ळी येथील जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत अळ्या तरंगत असतानाही खिचडी बनवली गेली. वाटप करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पालकांनी वेळीच लक्ष घातल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे  तक्रार करूनही एकही जबाबदार अधिकाºयांनी भेट न दिल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

चिक्केहळ्ळीत जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत शंभरहून अधिक पटसंख्या आहे. शुक्रवार, २८ जून रोजी दुपारी ३ वाजता सुटी झाली. दरम्यान, खिचडीसाठी तांदूळ  काढला गेला. त्यामध्ये अळ्या असल्याचे स्वयंपाकी महिला शीला बंदीछोडे आणि शोभा झळके यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सुतार यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यानंतरही खिचडी बनवली गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटपही करण्यात आले़ मुलांनी अळ्या असल्याचा कांगावा करताच ग्रामस्थ व पालक राहुल माने, विजय सोमवंशी, काशिनाथ जोगदे, गुंडप्पा अरकेरी, शिवानंद देगील, श्रीशैल म्हैसलगी, गुंडप्पा पुजारी यांनी मुख्याध्यापक यांना जाब विचारला, परंतु मुख्याध्यापकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. शिक्षण विभागाकडूनही या घटनेकडे दुर्लक्ष झाले. घटना घडून दोन दिवस लोटले तरी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली नाही.-------------फोन वाजला...पण उचलला नाहीयाबाबत माहिती व म्हणणे घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी राजकुमार नागणसुरे व संबंधित मुख्याध्यापक गुरुनाथ सुतार यांना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क साधला असता दोघांनीही कॉल घेतला नाही़ —-----------शाळेत दररोज दिल्या जाणाºया खिचडीच्या तांदळात अळ्या तरंगत असताना स्वयंपाकी महिलांनी मुख्याध्यापक सुतार यांच्या लक्षात आणून दिले होते; मात्र त्यांनी त्याचे गांभीर्याने घेतले नाही़ त्याचाच भात बनवून विद्यार्थ्यांना देताना गोंधळ झाला.- राहुल मानेग्रामस्थ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळा