शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: भूमी अभिलेख :जमीन बळकावण्याचे प्रमाण थांबणार; थेट उपग्रहाद्वारे मोजणी होणार

By संताजी शिंदे | Updated: March 1, 2023 19:24 IST

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी, जिल्हा भूमी अभिलेख विभागाला एकूण ३८ मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी, जिल्हा भूमी अभिलेख विभागाला एकूण ३८ मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशीनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरूपी जतन होणार आहेत.

जमीन मोजणी ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी ३८ रोव्हर मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या मशीनद्वारे मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन मशीन उपलब्ध झाल्यानंतर जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा वेगाने करणे सहज सोपे होणार आहे. शिवाय एका प्रकरणाची मोजणी केवळ अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकणार आहे. काही ठिकाणी बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात. मात्र, रोव्हर मशीनद्वारे जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे निश्चित होत असल्याने बांध खोदून दुसऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते समजणार आहे. भूकंप, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे जमिनीच्या खुणा गेल्या, तरीही हद्द निश्चित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

 मशीनद्वारे अशी होईल मोजणी० रोव्हर मशीनने मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने मोजणी स्थानके (कॉर्स) उभारली जात आहेत.० उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे मोजणी करायच्या ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश दर्शविण्यात येईल.० कॉर्सद्वारे होणारी मोजणी ही रोव्हरमध्ये साठविली जाणार आहे.० अक्षांश-रेखांशांवरून ऑटोकॅड संगणकप्रणालीचा वापर करून नकाशे तयार होणार आहेत.० रोव्हर मशीनमुळे १० एकर जमिनीची मोजणी केवळ ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य आहे.

 पाच हजार प्रकरणे प्रलंबितकमी मनुष्यबळामुळे मोजणीसाठी आलेली प्रकरणे रखडली आहेत. जिल्ह्यातील जमीन मोजणी संबंधीची ५ हजार प्रकरणे सध्या जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. रोव्हर मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढले जातील, सद्य:स्थितीत सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रलंबित असणारी प्रकरणे मार्चपूर्वी निकाली काढण्याचे नियोजन केले आहे.- हेमंत सानप(अधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख विभाग, सोलापूर)

भाऊबंदकीत निर्माण होणार वाद कायमचे मिटणार!मोजणी कायमस्वरूपी व उपग्रहातून होणार असल्याने जमिनींच्या बांधांवरून होणारी भाऊबंदकी कायमची मिटणार आहे. या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या सह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर