शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हत्तूर ते बोरामणी बायपाससाठी भूसंपादन सुरू, पालकमंत्री देशमुख यांचा पाठपुरावा : २५ किमीचा बाह्यवळण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 14:47 IST

हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबाधित होणारी जमीन आणि जमीन मालकांच्या नावाची यादी लवकरच शासनाकडून जाहीर होणार बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरूसोलापूर-बार्शी रस्त्याचे कामही मार्गी

राकेश कदमआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १४  : हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाधित होणारी जमीन आणि जमीन मालकांच्या नावाची यादी लवकरच शासनाकडून जाहीर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सोलापूर ते हैदराबाद रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. हे काम खूपच संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. दुसरीकडे सोलापूर ते विजयपूर चौपदरीकरणाच्या तिसºया करारनाम्याचे काम सुरू आहे. या कामांतर्गत बाळे ते हत्तूर या दरम्यान बाह्यवळण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने हैदराबाद ते विजयपूर महामार्गावरून येणाºया वाहनांना बोरामणी ते हत्तूर बाह्यवळण देण्याचा प्रस्ताव होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मागील महिन्यात यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेतली होती. त्यानुसार अधिकाºयांनी आराखडा करून जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. ------------------------- सोलापूर-बार्शी रस्त्याचे कामही मार्गी केंद्र सरकारने महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत काही शहरांना जोडणाºया दुपदरीकरणाच्या कामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामध्ये औराद शहाजनी-निलंगा-उस्मानाबाद-तुळजापूर-बार्शी मार्गाचा समावेश होता. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी हे काम बार्शीवरून पुढे सोलापूरपर्यंत आणण्यात यश मिळवले आहे. सोलापूर-बार्शी मार्गावर माळढोक अभयारण्य परिक्षेत्रही येते. परंतु, नव्या कामासाठी जादा जमीन लागणार नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवरच उत्तम दुपदरीकरण केले जाणार आहे. ----------------- रस्त्याच्या चारही बाजूंचे महामार्ग पूर्ण करतानाच रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात बोरामणी ते हत्तूर, हत्तूर ते बाळे असा मार्ग साकारण्यात येईल. हे मार्ग पुढे हैदराबाद रस्त्यावर बोरामणी येथे जोडले जातील. तूर्तास दोन बाह्यवळणांसाठी प्राधान्याने काम केले जात आहे. ------------------- हत्तूर ते बोरामणी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करावी, असे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. हा रस्ता सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय शहरातील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी १२० कोटी रुपयांची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. बाधित लोकांना इतर प्रकारेही मदत करण्यात येणार आहे. - विजयकुमार देशमुख, पालकमंत्री. -----------------असा होणार मार्ग - बोरामणी-मुळेगाव-कुंभारी-होटगी-हत्तूर (एकूण २५.३८ किमी). या कामामुळे हैदाराबाद-विजयपूर महामार्गाबरोबरच सोलापूर-तुळजापूरमार्गे येणारी वाहने मार्केट यार्ड चौकातून येण्याऐवजी थेट बाह्यवळणावरून हत्तूरकडे जाऊ शकतील. या रस्त्याचा प्रस्ताव २०११ मध्ये तयार करण्यात आला होता, परंतु काम आता मार्गी लागले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्ग