शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:26 AM

आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

ठळक मुद्देसिध्देश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली यात्रा असल्याने भाविक आणि माणसांना प्राधान्य देऊन शहराला पाणी सोडावे, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले : जिल्हाधिकारीएसीमध्ये बसून काम करण्याऐवजी लोकांमध्ये जा, माहिती घ्या आणि काम करा : जिल्हाधिकारी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १०  : आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सुरुवातीला शालेय जीवनापासून पशुवैद्यकीय पदवीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले की, पदवी घेतल्यानंतर काही दिवस मार्केटिंगचे काम केले. माझे नेहमी सांगणे असते की, माणसाने आयुष्यात सेल्समन म्हणून काम करायला हवे. मग आपण किती  पाण्यात आहोत हे समजते. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात काही दिवस पशुवैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन उपजिल्हाधिकारी झालो आणि रत्नागिरी येथे रुजू झालो. प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काही दिवस उल्हासनगर येथेही काम केले. १९९५ ची निवडणूक, २००९ ची माढा लोकसभा निवडणूक आदींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.  मला २५ ते २६ वरिष्ठ अधिकाºयांसोबत सेकंड इन कमांड म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यातून खूप शिकायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रमोद बोडके यांनी केले.-----------------------------सामाजिक आणि संवेदनशील पैलूंचाही उलगडावार्तालापात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या कार्यशैलीचा आणि संवेदनशील पैैलूंचाही उलगडा झाला. जव्हार येथे प्रातांधिकारी म्हणून काम करतानाचा किस्सा सांगताना डॉ. भोसले म्हणाले की, जव्हार येथील आदिवासी भागातील अनेक लोक जमिनीच्या वादासंदर्भातील सुनावणीला येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे एके दिवशी एसटी चालक आणि कंडक्टर यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर रात्री मुक्कामाला जाणाºया बस चालकांकडे नोटिसा देऊन त्या पोहोच होतील, अशी व्यवस्था केली. शेवटी लोकांमध्ये मिसळून काम केल्याशिवाय कामे पूर्ण होणार नाहीत. जलसंपदा विभागाने माणसांना प्राधान्य द्यावेसिध्देश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडू अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी म्हणाले की, यात्रा असल्याने भाविक आणि माणसांना प्राधान्य देऊन शहराला पाणी सोडावे, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. थकीत पाणीपट्टीसंदर्भात बैठक घेऊ, असे त्यांना सांगितले आहे. सिध्देश्वर यात्रेतील रस्त्याचा विषय हा धगधगता नाही. तो माझ्यासाठी आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. ----------------------------जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे सल्ले- आम्ही प्रशासनातील लोक हे जनरल फिजिशियनसारखे आहोत. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेली औषधे, आयुधे कोणती आहेत ही माहिती हवी. ही आयुधे वापरून लोकांची कामे करायला हवीत. - एसीमध्ये बसून काम करण्याऐवजी लोकांमध्ये जा, माहिती घ्या आणि काम करा. च्अपमान लक्षात ठेवावा, त्यातून शिकावे पण अपमान करणाºयाला लक्षात ठेवू नये.- मुंबई उपनगरात काम करताना ४० हजार अतिक्रमणे काढली, परंतु एकदाही वाद झाला नाही. बुल्डोझर घेऊन फिरण्यापेक्षा कायदेशीर मार्गांचा पुरेपूर वापर केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो हे मी दाखवून दिले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय