शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

लालपरी ५०० किलोपर्यंत माल वाहणार; नव्या विभागात बाराशेजण राबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 11:42 IST

नवीन वर्षातील मुहूर्त : उत्पन्नवाढीसाठी आता स्वत:ची सेवा

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटी’च्या उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी आता प्रशासन स्वत:ची पार्सल सेवा पुन्हा सुरू करणार आहे. यासाठी मात्र नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

सध्या एसटीची पार्सल सेवा एका खासगी कंपनीकडून चालवण्यात येत आहे; बसमधून जास्तीतजास्त पाचशे किलोपर्यंत पार्सल घेऊन जाता येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या बाराशे कर्मचाऱ्यांची निवड करून एक वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे़ याला पार्सल अ‍ॅन्ड लॉजिस्टिक डिपार्टमेंट असे नाव देण्यात येणार असून या माध्यमातून पार्सल आणि मालवाहतूक सेवा या दोन्ही सुरु होणार आहेत.

या सेवेच्या नियंत्रणासाठी वाहतूक नियंत्रक हा विभागप्रमुख आणि सहायक हे त्यांना मदत करतील. यासाठी प्रत्येक स्टॅन्डवर एक स्वतंत्र विभाग असणार आहे़ सध्या खासगी कंपनीकडून सुरू असलेल्या सेवेबद्दल पुढील काही दिवसातच निर्णय होणार आहे.

उत्पन्न वाढणार

नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाकडून पार्सल सेवा सुरू करण्यात आली होती़ पण त्यानंतर पार्सल सेवेसाठी खासगी कंपनी निवडण्यात आली़ यासाठी कंपनीकडून जवळपास ३६ कोटी रुपये प्रशासनाला मिळतात़ प्रशासनाने हा विभाग पुन्हा सुरू केल्यास प्रशासनाला कंपनीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संप