सोलापूर : प्लॉट देतो, असे सांगून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या उद्योजक कुमार करजगीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश पानसरे यांनी दिला.करजगी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सभासदांना प्लॉट खरेदी करून देतो, असे सांगून पैसे घेऊन अनेकांची फसवणूक केल्याबद्दल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सभासदांचा विश्वासघात करून फसवणूक केली, अशी तक्रार अजितकुमार देशपांडे यांनी पोलिसांकडे केली आहे. न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. (प्रतिनिधी)
कुमार करजगी न्यायालयीन कोठडीत
By admin | Updated: March 31, 2017 03:55 IST