शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या हरणावर कुत्र्याचा हल्ला; बंकलगी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:05 IST

सोलापूर : पिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हरिण गंभीररित्या जखमी झाले. त्याचे ...

ठळक मुद्देशेपूट तोडले, उपचारानंतर सोडले पुन्हा कळपातपिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवलाहरिणाच्या कळपाचा शोध घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले

सोलापूर: पिण्याच्या पाण्याच्या आशेने पाण्याच्या टाकीजवळ आलेल्या हरिणावर तीन कुत्र्यांनी हल्ला चढवला. यात हरिण गंभीररित्या जखमी झाले. त्याचे शेपूटही तुटले. वन्यजीवप्रेमी,वनविभाग,अ‍ॅनिमल राहत संस्था या सर्वांच्या प्रयत्नांनी त्याच्यावर उपचार करून शनिवारी त्याला हरिणाच्या कळपाचा शोध घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे हा प्रकार घडला. 

या घटनेची पार्श्वभूमी अशी की, २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास लक्ष्मण कोणदे (कारभारी) यांच्या शेतात तहानलेले एक हरिण पाण्याच्या शोधात टाकीजवळ आले. जवळच असलेल्या तीन कुत्र्यांनी  त्या हरिणावर हल्ला केला. घोटभर पाणीही हरिणास  पिता आले नाही. याचवेळी तेथे असलेल्या सिद्धाराम, नागनाथ कोणदे आणि शाळकरी मुलांनी मिळून कुत्र्याच्या तावडीतून हरिणास वाचवले.

गावातल्याच प्राणीमित्र यांना बोलावून घटनेची माहिती दिली. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून  घटनेची माहिती दिली. हरिण प्रवासात उपचारासाठी घेऊन जाताना घाबरुन जाऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर अ‍ॅनिमल राहत संस्थेचे डॉ.राकेश चित्तोड  यांच्याशी चर्चा करून तत्काळ रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यात आले. पुढील उपचार अ‍ॅनिमल राहतच्या टीमने केले. पुढील देखभालीसाठी प्राणीमित्र बहुउद्देशीय संस्था, बंकलगीचे मल्लिकार्जुन धुळखेडे यांच्याकडेच सोपविण्यात आले.

हरिणाचे  शेपूट तुटलेले होते. वनविभागाचे अधिकारी निकेतन जाधव,वनरक्षक भुई आणि अ‍ॅनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोड, डॉ. जाधव,  भीमाशंकर विजापुरे, डॉ. वर्षा पांचाळ, सुनील अरळीकट्टी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि तीन दिवसांच्या उपचारानंतर अखेर शनिवारी त्या हरिणास सुखरुप त्याच्या कळपाचा शोध घेऊन तेथे सोडण्यात यश मिळाले. हरिणाचे प्राण वाचल्यामुळे गावकरी व प्राणीमित्र व वन्यजीव प्रेमींच्या चेहºयावर आनंद दिसून आला.

टॅग्स :SolapurसोलापूरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार