शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

करमाळयाजवळ पुलावरून जीप कालव्यात कोसळली, तिघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:25 IST

टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे.

ठळक मुद्दे टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडलेबोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडलीयाच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले

सोलापूर / करमाळा :  गोवा येथे  फिरण्यासाठी निघालेली बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून कालव्यात पडल्याने जीप मधील तिघे जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावर करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ घडली आहे. अपघातात ठार झालेले तिघे ही जामनेर जि.जळगाव येथील आहेत.

 शेख फारूक शेख रमजान (वय ५७), तयरीम शेख जफर (वय २०), फरहान शेख एहसान (वय २२) हे अपघातात मरण पावलेले तिघे आहेत.  रमजान ईद चा सण झाल्यानंतर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी जामनेर जि.जळगाव येथून गोवा येथे  शेख कुटुंबिय दोन वाहनातून मंगळवारी राञी ९ वा.निघाले होते.

रस्त्यात औरंगाबाद येथे राञी १२ वाजण्याच्या सुमारास जेवन केल्यानंतर अहमदनगरमार्गे निघाले असता पहाटे चारच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुंभेज फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचा कठडा तोडून बोलेरो जीप क्र.एम.एच.१९/ ९८५६ कालव्यात पडली व त्या मधील तिघे जागीच ठार झाले. दुस-या वाहनातून निघालेल्यांना अपघाताची माहीती मिळाली नाही ते पुढे पंढरपूर पर्यंत समकाळी ६.३० वा.पर्यंत पोहचले होते. अपघाताची खबर पोलिसांना सकाळी मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले.मयत शेख फारूक यांच्या खिशातील मोबाइल घेऊन त्यांनी केलेल्या काँल वर फोन केल्यानंतर अपघाताची माहीती पुढे गेलेल्या नातेवाईकांना समजली.-------------अरूंद रस्त्याचे बळी..टेभूर्णी-अहमदनगर राज्य मार्गावरील टेभूर्णी ते जातेगाव रस्त्याच्या चौपदरी चे काम रखडले असून अरूंद रस्ता व पुलाचा अंदाज न आल्याने बोलेरो पुलाचा कठडा तोडून कालव्यात पडली व तिघे ठार झाले. याच मार्गावर गेल्या तीन वर्षात १५४ जण अपघातात बळी गेले आहेत.फोटो

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात