शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काजल जाधव बनली वडशिंगेची ‘गीता फोगाट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 12:10 IST

अमर गायकवाड  माढा: मुलगा झाला नाही म्हणून नाराज झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीत आणून जागतिक पातळीवर नाव गाजविणाºया हरियाणाच्या ...

ठळक मुद्देदूध विक्रीच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील यासाठी मेहनत घेत आहेतदेशपातळीवरील कुस्तीमध्ये आपला दबदबा कायम राखण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसते

अमर गायकवाड 

माढा: मुलगा झाला नाही म्हणून नाराज झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलींना कुस्तीत आणून जागतिक पातळीवर नाव गाजविणाºया हरियाणाच्या ‘गीता फोगाट’ची कहाणी ‘दंगल’ चित्रपटातून आमीर खानने दाखविली आहे. अगदी तशीच कथा घडलीय माढा तालुक्यात. वडशिंगेच्या या ‘गीता फोगाट’चे नाव आहे काजल जाधव. तिला प्रोत्साहन देणारे वडील अशोक जाधव यांची ही कथा आहे.

घरात दुसरी मुलगी झाली म्हणून अशोक जाधव नाराज होते. अगदी आपली पत्नी आणि दुसºया मुलीला पाहायलादेखील ते गेले नाहीत. शेवटी मामाने घरी आणून सोडले. नाराज झालेल्या वडिलांनी दोन वर्षे तिच्याबद्दल सहानुभूती दाखविली नाही. अशोक जाधव गावात पैलवानांना मार्गदर्शन करीत होते. रोज बाहेर जाणाºया वडिलांना कोठे जाता हे काजलने विचारून आपणही येणार असल्याचे सांगितले. वारंवार हट्ट धरल्यानंतर वडील तिला तालमीत घेऊन जायला तयार झाले. वडिलांनी ‘खेळशील का कुस्ती?’ असे म्हटल्यावर क्षणाचा विलंब न लावता तिने होकार दिला. वडिलांनीही तिला कुस्तीचे सारे डाव शिकविले.

बघता बघता वेगवेगळ्या आखाड्यात तिने कुस्त्या मारल्या. देशपातळीवरील कुस्तीमध्ये आपला दबदबा कायम राखण्याचे तिचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसते आहे. पुणे येथे गेल्यावर्षीपासून चालू झालेल्या प्रो कुस्ती महाराष्ट्र लीग स्पर्धेत खेळण्यासाठी ती सराव करत असून, ती जागतिक कुस्तीपटू व्हायचे हे स्वप्न बाळगत त्यादृष्टीने सराव करीत आहे. शाकाहारी असलेल्या काजलला खुराकासाठी साधारणपणे महिन्याकाठी १५ हजार रुपयांचा खर्च येत असून, सफरचंद, चिकू, केळी, अंडी, बदाम, दही, दूध, पनीर, प्रोटिन यासारखा आहार ती घेते. ती मांसाहारी जेवण घेत नाही.

दूध विक्रीच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडील यासाठी मेहनत घेत आहेत. म्हसवड येथील माणदेशी पतसंस्थेच्या माध्यमातून तिला दरमहा सात हजार रुपये मानधनदेखील मिळत आहे. वस्ताद अस्लम काझी व कोच अंकुश आरकिले, आबा नरोटे, श्रीहरी तरंगे, वडील अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे.

पदकांची कमाई- वयाच्या १७ व्या वर्षात आपल्या वजनीगटात पुणे महापौर केसरी, सोलापूरचा जिजाऊ केसरी, सिद्धेश्वर केसरी, वाशिम केसरी होण्याचा मान तिने मिळविला. दिल्ली, औरंगाबाद, परभणी, तेलंगणा, हरियाणा, वर्धा या ठिकाणी दोन सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्य पदके मिळविली आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर