शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जरा शर्म करोऽऽऽ, शर्म करो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 15:28 IST

पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा ...

पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा पराक्रम, त्याग नागरिकांच्या मनापर्यंत फारसा पोहोचायचा नाही. त्यात आपल्या गावातला पोरगा सैन्यात म्हणजे तो काय लढाई करणार? ही मानसिकता चालत आलेली. ‘घर की मुर्गी, दाल बराबर’ असंच असतं ना!

आपल्या गावातला तरुण सैन्यात भरती झाला असला तरी तो तिथं भटारखान्यात काम करीत असणार एवढी तुच्छ मानसिकता काही वर्षांपूर्वीपर्यंत अनुभवायला मिळत होती. जेव्हा कारगिल युद्ध झालं अन् गावागावांतले भारतमातेचे सुपुत्र शहीद झाले तेव्हा कुठं या मानसिकतेला जबरदस्त चपराक बसली. आपल्या भागातले जवानही प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढतात, याची साक्ष त्याच्याच मृतदेहाला द्यावी लागली होती. आज तर काय, रोजचंच युद्ध! दहशतवाद्यांच्या गोळ्या रोज आपल्या जवानांच्या छातीत घुसताहेत. देशातला नागरिक सुरक्षित राहावा यासाठी हे जवान छातीवर गोळ्या झेलतात, पण त्याच देशातले सुरक्षित असणारे नागरिक त्यांचा किती आदर करतात, हे तपासून पाहायलाच हवे! सैन्यातून निवृत्त झालेले जवानही आज या शत्रूंवर चाल करून जाण्यास उत्सुक आहेत. हे असतं खरंखुरं देशप्रेम! आपल्या नागरिकांतही देशप्रेम ठासून भरलेलं आहे, पण याच देशात सैनिकांचा सन्मान न करणारे लोकही मूठभर का होईना पण आहेतच की!

अतिरेकी हल्ल्यात आपला एखादा जवान शहीद झाला की, अनेकांना देशप्रेम आठवतं. भूकंपासारखी मोठी आपत्ती आली की, मदतीसाठी सैनिक आठवतो. आपल्या प्रत्येक श्वासासोबत असणाºया सैनिकांसाठी आपण काय करतो हो? एरवी या जवानांबद्दल आपण आपला आदर कृतीतून कितपत व्यक्त करतो हो? जवान आपल्या पत्नीला, लहान मुलांना गावी ठेवून शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्याची तयारी करून जातो ते तुमच्या-आमच्या रक्षणासाठी गावाकडे असणाºया त्याच्या कुटुंबाच्या सामान्य अडचणीत तरी आपण कितपत मदतीला जातो? ‘जय जवान जय किसान’च्या घोषणा देत ‘अमर रहे’च्या घोषणाही देण्याची वेळ येते. एका पत्नीचा नवरा जातो, लहान बालकांचा बाप जातो, म्हाताºया आईचा आधार जातो. असं सगळेच गेलेलं असतं त्या कुटुंबाचं!

भारतमातेच्या एका सुपुत्राचं बलिदान गेलेलं असतं. जवान युद्धभूमीवर असतानाही गावात त्याच्या कुटुंबाला त्रास देणं, त्याची जमीन हडपणे असे प्रकार नाहीत का घडत? चांगलं नागरिक बनता आलं तरी देशासाठी खूप काही केल्यासारखं आहे. प्रत्यक्ष लढाईच केली पाहिजे असं कुठंय? चांगलं नागरिकच बनता येत नसलं तर काय अर्थ आहे हो मेणबत्त्यांचा अन् घोषणा देण्याचा? गावाकडे सुट्टीवर आलेल्या जवानांचा साधा आदर करता येत नसेल तर कशाला हव्यात या गप्पा? भ्रष्टाचार हा सुद्धा एक देशद्रोहच नाही का? तिकडे जवान आपल्या प्राणाची आहुती देतात अन् इकडं भ्रष्टाचारानं देश खिळखिळा केला जातो. अशा गिधाडांच्या रक्षणासाठी जवानांनी आपले बळी द्यावेत काय? भ्रष्टाचार हा केवळ पैशांचाच होतो असे नाही, कुठलाही भ्रष्ट आचार हाच तर भ्रष्टाचार ना! या देशाचे कायदे पाळण्यापेक्षा ते मोडणारेच दिसू लागलेत. साधे वाहतुकीचे नियम तरी किती पाळतो हो आपण? आपलं हे वागणं देशाला अभिप्रेत असतं काय? किती जण स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी असतात हो?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा इथं दहशतवाद्यांनी भारतमातेच्या सुपुत्रांवर हल्ला केला. देशाच्या काळजात आकांत अन् डोळ्यात अंगार फुलला. शहिदांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी काही हात पुढे सरसावले. सुरतच्या एका व्यापाºयानं तर आपल्या मुलीच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रद्द करून शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अकरा लाखांची मदत दिली. सव्वाशे कोटींच्या देशात बोटांवर मोजावे एवढेच दानवीर? लग्न सोहळ्यात कोट्यवधींचा खर्च करणारे अन् डान्स बारमध्ये नोटांची मुक्त उधळण करणारे कुठं गेलेत? ज्यांच्या जिवावर आपण मोकळा श्वास घेतोय त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची काही भावना? अरे, मदत राहू द्या!

तुमच्या मदतीची वाट नाही पाहत त्यागी जवानाचं स्वाभिमानी कुटुंब! किमान जवानांचा आदर तरी करा. पुलवामातल्या दुर्दैवी घटनेनं सारा देश रडतो आहे आणि इकडं बारामतीच्या पोलिसांनी शोकसभेची परवानगी मागण्यासाठी आलेल्या सीआरपीएफच्या अशोक इंगवले या जवानाला बेदम मारहाण केल्याची, त्यांच्यासोबतच्या निवृत्त जवानाला धक्काबुक्की केल्याची बातमी येतेय! तुमच्यासाठी रक्त सांडणाºयांचंही रक्तअसं हिसकावून घेता? हाच का आपल्या जवानांचा आपल्याकडून होत असलेला आदर? हा आदरही करता येत नसेल तर बंद करा त्या घोषणा! विझवा त्या मेणबत्त्या! ए मेरे वतन के लोगों, जरा शर्म करोऽऽ, शर्म करो..!  -अशोक गोडगे-कदम(लेखक ज्येष्ठ साहित्यिक अन् अभिनेते आहेत)  

टॅग्स :SolapurसोलापूरSoldierसैनिकpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला