शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

 सोलापूर जिल्ह्यातील ‘दूध पंढरी’च्या येणेबाकीसाठी न्यायालयीन लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:25 IST

साडेपाच कोटी थकबाकी, जिल्हाभरातील ५२६ दूध संस्था, गाय खरेदी व अन्य बाबींसाठी दिलेली अनामत वसुलीसाठी ५२६ संस्थांवर दावे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ(दूध पंढरी) जिल्ह्यात सर्वात मोठा सहकारी संघएकीकडे दूध संघाचे देणे असताना खासगी संघाला दूध पुरवठा सुरू

सोलापूर: दूध दराच्या कोंडीमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाला दिलेले पैसे वसुलीसाठी न्यायालयामार्फत झगडावे लागत आहे. गाय खरेदी व अन्य बाबींसाठी दिलेली अनामत वसुलीसाठी ५२६ संस्थांवर दावे दाखल केले आहेत.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ(दूध पंढरी) जिल्ह्यात सर्वात मोठा सहकारी संघ आहे. जिल्हाभरात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करुन वाड्यावस्त्यांवर दूध संकलन दूध संघामुळे सुरू झाले; मात्र खासगीकरणाच्या निर्णयानंतर वाढलेल्या स्पर्धेत दूध पंढरीकडून कर्ज उचलून गाय, पशुखाद्य व अन्य कामासाठी अनामत उचलणाºया अनेक संस्थांनी सोलापूर जिल्हा सहकारी संघाला दूध घालणे बंद केले.

एकीकडे दूध संघाचे देणे असताना खासगी संघाला दूध पुरवठा सुरू केला; मात्र संघाची येणेबाकी भरली नाही. यावर सोलापूर जिल्हा दूध संघाने सहकार न्यायालयात अशा  ५२६ संस्थांवर कलम ९१ अन्वये वसुलीसाठी दावे दाखल केले. या संस्थांकडे संघाची ५ कोटी ४० लाख २० हजार १८१ रुपये इतकी येणेबाकी आहे. 

दावा दाखल केलेल्यांपैकी ३२२ संस्थांच्या विरोधात म्हणजे दूध संघाच्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिले असून ३ कोटी ५१ लाख ४३ हजार ३५३ रुपये इतकी मूळ रक्कम  व त्यावर १२ टक्के व्याज दावा दाखल तारखेपासून शिवाय दाव्यासाठी झालेला खर्चही वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित २०४ संस्थांकडील येणेबाकीसाठी न्यायालयातील दाव्यावर सुनावणी सुरू असून लवकरच यावरही निर्णय होईल असे सांगण्यात आले.

 ६७ संस्थांवर गुन्हे दाखल

  • - अनामत रक्कम घेतलेल्या व दूध संघाला दूध पुरवठा बंद केलेल्या ६७ संस्थांचे चेअरमन व सचिवावर एक कोटी १७ लाख ५ हजार १९ रुपये वसुलीसाठी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस कारवाई करुन ही रक्कम वसुलीची प्रक्रिया राबवली जात आहे.
  • - न्यायालयीन लढाई असलेल्या संस्थांपैकी काहींनी मार्च १७ पर्यंत ४५ लाख ८४ हजार ८४२ रुपये व एप्रिल १७ पासून मागील महिन्यापर्यंत ९ लाख ८८ हजार ८१७ रुपयांचा भरणा केला असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. 
  • - २०१० पासून दूध संघाने जिल्हाभरातील दूध संस्थांना गाय खरेदी, पशुखाद्यसाठी अनामत ७० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यापैकी गाय खरेदीसाठी ५५ कोटी तर १५ कोटी रुपये पशुखाद्य व अन्यसाठी दिले होते. ही रक्कम दूध संघाने बँकांकडून व्याजाने घेतली आहे.
  • - न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित संस्थांकडून वसुलीसाठी प्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. बºयाच संस्था वसुलीसाठी सहकार्य करीत असल्या तरी ज्या संस्था सहकार्य करीत नाहीत त्या संस्थांच्या पदाधिकाºयांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची कार्यवाही सुरू आहे.

खासगी संघापेक्षा चांगल्या सुविधा दिल्या, दूध वाढीसाठी संस्थांच्या मागणीप्रमाणे कर्ज काढून पैसे दिले. अनेक संस्थांनी प्रामाणिकपणे पैसे भरले व दूध संघालाच दूध घातले. अनेक संस्थांनी आमचे देणे असतानाही खासगी संघाला दूध पुरवठा सुरू केला.- सतीश मुळे,व्यवस्थापकीय संचालक, दूध पंढरी 

टॅग्स :SolapurसोलापूरbankबँकPrashant Paricharakप्रशांत परिचारक