शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील विश्रामगृहातील अस्वच्छतेबाबत न्यायमूर्ती नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:56 IST

बांधकाम विभागाचे कार्यकारीअभियंता विलास मोरे यांना नोटीस बजावण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले आहेत. 

ठळक मुद्देन्यायमूर्तींसाठी आरक्षित असलेल्या कक्षात नळ तुटलेलेअपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना पाहणी करण्याची सूचना केलीअनेकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी

सोलापूर : सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात शासनातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नेहमी येत असतात. हाच अनुभव  उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही आला. याप्रकरणावरुन आता बांधकाम विभागाचे कार्यकारीअभियंता विलास मोरे यांना नोटीस बजावण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले आहेत. 

मूळचे महाराष्ट्रीयन असलेले उत्तर प्रदेशातील एका उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमवारी कामानिमित्त सोलापुरात आले होते. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या पुष्कर इमारतीमध्ये त्यांच्यासाठी कक्ष आरक्षित करण्यात आला होता. या इमारतीमधील सूट हे शासनातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच आरक्षित असतात. ही इमारत नवी असल्याने आतील सुविधा विशेष असाव्यात, अशी अपेक्षा असते, परंतु गेल्या काही दिवसांपासून या इमारतीतील कक्षामध्ये अनेकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

न्यायमूर्तींसाठी आरक्षित असलेल्या कक्षात नळ तुटलेले होते. टॉवेल, चादरी, बेडशीट आदी खूपच अस्वच्छ होते. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कानावर गेली. जिल्हाधिकारी ग्रामीण दौºयावर असल्याने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना पाहणी करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन पाहणी केली. सोबत कार्यकारी अभियंता विलास मोरे उपस्थित होते. 

शिंदे यांनाही गैैरसोयी आढळून आल्या. यावरुन त्यांनी विलास मोरे यांना कारणा दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले. 

पालकमंत्रीही नाराज- सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे यांच्या कारभाराबाबत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला, पण बांधकाम खात्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. शासकीय विश्रामगृहातील सुविधांसाठी विशेष निधी मिळतो. हा निधी व्यवस्थित खर्च होत नसल्याचेही पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी दाखवून दिले होते. न्यायमूर्तीच्या नाराजीमुळे ही बाब आणखी अधोरेखित झाली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय