शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सोलापुरात ‘जय’सिद्धेश्वर, माढ्यात रण‘जित’सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:55 AM

भाजपकडून विजयाचा जल्लोष, काँग्रेस आणि ‘वंचित’च्या गोटात सन्नाटा

ठळक मुद्देअक्कलकोट, ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघांनी दिली महाराजांना साथशहर उत्तरमध्येही मतदारांनी भाजपवर मारला पुन्हा शिक्कारणजितसिंहांना माळशिरस, माण-खटावने दिली साथ

सोलापूर :  सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. सोलापुरातून भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले. माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसºयांदा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला आहे. 

भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना उमेदवारी दिली. महाराजांनी विरोधकांवर टीका न करता प्रचार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांची निष्क्रियता, शहराचा रखडलेला विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे आणि प्रकाश आंबेडकर यांची मतविभाजनाची भूमिका आदी मुद्यांवर टीका केली. पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेचा रोख सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच अधिक राहिला.

वंचित बहुजन आघाडीने पार्क स्टेडियमवर घेतलेली जाहीर सभा लक्षवेधी ठरली होती. परंतु, तरीही ते तिसºया क्रमाकांवर राहिले. मोदी लाटेचा प्रभाव, ग्रामीण भागातून मिळालेली शिवसेनेची मदत आणि नियोजनपूर्वक काम यामुळे भाजपला यश मिळाले. भाजपने माढ्यातून संजय शिंंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिंदे यांनी नकार दिला. यादरम्यान राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यामुळे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपकडून रणजितदादांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फलटणच्या रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. निंबाळकरांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. निंबाळकरांमुळे माढ्यातील बेरजेचे राजकारण जुळून येईल हा अंदाज खरा ठरला. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आणखी काही नेत्यांना भाजपत आणले.  

मोहिते-पाटील ठरले किंगमेकरमाढ्यासाठी जिल्ह्यातील दोन तरुण नेते दहा वर्षांपासून झगडत आहेत. त्या तुलनेत रणजितसिंह निंबाळकर हे नवखे उमेदवार होते. भाजपसाठी ही रिस्क होती. पण  ही निवडणूक मोहिते-पाटील प्रतिष्ठेची करतील हा भाजपचा अंदाज खरा ठरला.  मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून मताधिक्य तर दिलेच. करमाळा, माढ्यातील शिंदे विरोधकांची मोट बांधली. त्यामुळे करमाळा, माढ्यातून शिंदे यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळाले नाही. मोहिते-पाटील खºया अर्थाने किंगमेकर ठरले.   

 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढा