शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ब्रिटिश राजवटीतच सोलापूरनं अनुभवला ‘स्वातंत्र्या’चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 12:50 IST

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं; पण तत्पूर्वी ९, १० आणि ११ मे १९३० रोजीच सोलापूर ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालं. ‘ब्रिटिशांचं राज्य गेलं, गांधींचं राज्य आलं’ असं गृह विभागाच्या पुण्यातील अधिकाऱ्यानं हिंदुस्थान सरकारला कळवूनही टाकलं..हे सारं घडलं हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा श्रीकिसन सारडा अन् हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं बलिदान अन् शेकडो सोलापूरकर देशभक्तांच्या लढ्यातून..स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सोलापूरला स्वातंत्र्याची फळं चाखायला दिली. त्यानंतर इंग्रजांनी मार्शल लॉ पुकारला अन् बनावट खटले दाखल करून १२ जानेवारी १९३१ रोजी सोलापूरच्या चार थोर सुपुत्रांना फाशीची शिक्षा दिली.

देशाभिमानी शहर असलेल्या सोलापूरच्या या देदीप्यमान इतिहासाला महात्मा गांधीजींचा मिठाच्या सत्याग्रहाची अन् त्यानंतर गांधीजींच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. आपल्या महान नेत्याला अटक झाल्याची बातमी ५ मे १९३० रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांच्या या शहरात संतापाची लाट उसळली. सभा, मिरवणुका आणि निदर्शनं सुरू झाली. आशण्णा इराबत्ती, डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, छन्नुसिंह चंदेले, रामभाऊ राजवाडे आणि महाजन वकील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. कलेक्टर हेनरी नाईट यांना या सभा पाहून धडकी भरली.

रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली. ही सारी झाडं तोडून टाकली. या घटनेनंतर कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांनी फौजफाट्यासह येऊन ८ ते १० तरुणांना पकडलं; पण त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली. ही नावं जाहीर करावीत, यासाठी तत्कालीन पुढारी मंडळी अन् पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी आताच्या बलिदान चौकात शंकर शिवदारे हा युवक हातात तिरंगा घेऊन कलेक्टरपर्यंत पोहोचला. शेजारी  सार्जंटने शंकरवर गोळी झाडली..भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सोलापूरकराने दिलेलं हे पहिलं बलिदान.

शिवदारेंच्या मृत्यूमुळे जमाव अतिशय संतप्त झाला. ब्रिटिशांच्या पोलिसांनाही जुमानेना; पण त्याचवेळी मल्लप्पा धनशेट्टी यांनी आपल्या एका वाक्यानं जमावाला शांत केलं.. धनशेट्टींचा केवढा हा वचक. ब्रिटिश अधिकारी अन् पोलिसांना हाच वचक सहन झाला नाही. त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला. एका लहान मुलाला गोळी लागली. त्याच्या डोक्याचे अक्षरश: तुकडे झाले..मग जमाव अधिकच संतप्त झाला. त्यानंतर मंगळवार पेठ पोलीस चौकीवर जमावानं हल्ला केला. ब्रिटिशांची पळता भुई थोडी झाली अन् अवघ्या शहरावर सोलापूरकरांचं राज्य प्रस्थापित झालं. त्यानंतर ब्रिटिश सरकार मात्र खडबडून जागं झालं.

१२ मे १९३० रोजी लष्करानं शहराचा ताबा घेतला. १५ मे रोजी अधिकृतपणे मार्शल लॉ लागू झाला, तो ३० जून १९३० पर्यंत होता. या दरम्यानच मल्लप्पा रेवणसिद्ध धनशेट्टी (वय ३२), श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय ३६), जगन्नाथ भगवान शिंदे (वय २४) आणि ‘गझनफर’ कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना ताब्यात घेऊन बनावट पुरावे तयार करून खटला रचण्यात आला. १२ जानेवारी १९३१ रोजी सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचा तो पहिला दिवस होता. 

सोलापूरच्या या अभूतपूर्व इतिहासावर व्यं. गो. अंदूरकर. डॉ. य. दि. फडके. प्रा. रमेश परळकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी विपुल लेखन केलं आहे. सोलापूरच्या या थोर वीरांना शब्दांजली ! - रवींद्र देशमुख, मुख्य उपसंपादक, लोकमत, सोलापूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतSolapurसोलापूर