शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दिसतो हापूस..! बाजारात आंबा मात्र कर्नाटकाचा अन हैद्राबादचा 

By दिपक दुपारगुडे | Updated: March 21, 2023 12:46 IST

सोलापुरात कोकणचा राजा म्हणून बनावट आंब्याची विक्री 

दीपक दुपारगुडे, सोलापूर : तोच रंग, तोच आकार अगदी अस्सल देवगडच्या हापूस आंब्यासारखा पण हापूस मात्र नाही. कर्नाटकातील बनावट हापूस आंबे सोलापूरच्या  बाजारात दाखल झाली आहेत. पण तुम्ही खरेदी करत असलेला आंबा हापूसच आहे का? हे एकदा पडताळून घ्या. कारण हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा आंबा देऊन विक्री होत आहे. कर्नाटक हापूस म्हणून ओळखला जाणारा हा आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जात असल्यानं ग्राहकांबरोबरोच  शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाजारपेठांमध्ये हापूस दाखल झाला आहे मात्र कर्नाटक आणि इतर राज्यातील आंबे हापूस विक्री केली जात असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे दर कमी मिळत असल्यामुळे सामान्य नागरिक देखील आंबे खरेदी करताना दिसत आहेत. बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. २० एप्रिलनंतर आंब्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल, ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. 

असं ओळखावा अस्सल हापूस?

'अस्सल हापूसला सुगंध असतो. या सुगंधावरुन आपण त्याची पारख करु शकतो. त्याबरोबर त्या आंब्याची साल ही कमी जाडीची आणि पातळ असते. हा आंबा कापल्यानंतर गडद केसरी रंगाचा असतो. तर इतर हापूस हा फिकट रंगाचा असतो. बनावट हापूस आंब्याची साल जाड असते. या प्रकारे ग्राहक अस्सल हापूस आंब्याती पारख करु शकतात.असे आहेत दर बदाम - ४० ते ८०लालबाग - ६० ते १२० हापूस ६००-१२००कर्नाटक हापूस -४००-६००

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :MangoआंबाSolapurसोलापूर