शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या संमतीनेच रात्रपाळीत कामावर बोलवा ! दुकाने, आस्थापनेसाठी नवीन नियम, किमान तीन महिला सहकारी असणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:45 IST

महाराष्टÑ शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने दुकाने आणि आस्थापनेसंदर्भातील नवीन नियम जारी केले असून, महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देउद्योग व कामगार विभागाने अन्य कामगारासंदर्भातही नियमावली जारी केली नियमांचा मसुदा ‘महाकामगार डॉट महाराष्टÑ डॉट गव्ह डॉट इन’वर उपलब्ध आहेसुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रपाळीत काम करणाºया महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणाहून घराच्या दारापर्यंत तसेच घराच्या दारापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितीत असलेली स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० :  महाराष्टÑ शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने दुकाने आणि आस्थापनेसंदर्भातील नवीन नियम जारी केले असून, महिला कामगारांना रात्रपाळीत कामावर बोलाविण्यासंदर्भात नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यानुसार आता महिला कामगारांना त्यांच्या संमतीनुसारच रात्री ९.३०  ते सकाळी ७ यावेळेत कामावर ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र यावेळेत किमान तीन महिला सहकारी उपस्थित असणे बंधनकारक आहे.यापूर्वी मार्च २०१५ मध्ये निघालेल्या अधिसूचनेनुसार महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर बोलावू नये, असे नियमामध्ये स्पष्ट केले होते. २ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत महिला कामगारांना रात्रीपाळीत कामावर  बोलाविण्यासंदर्भात दहा नियम जारी करण्यात आलेले आहेत. रात्रपाळीमध्ये काम करणारी महिला कामगार कामाच्या ठिकाणी जेथे वावर करणार आहे; तेथे योग्य दिवे आणि प्रकाशयोजना असणे सक्तीचे आहे. प्रसाधनगृहही सुरक्षित हवे. ते सुरक्षित असावे आणि आतून कडी लावण्याची सुविधा असली पाहिजे. शिवाय गरजेनुसार सॅनिटरी नॅपकिन्स पुरविण्यात यावेत, असेही या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही महिला कामगारास दिवसपाळीतून रात्रपाळीत आणि रात्रपाळीतून दिवसपाळीत बदली करताना मागील पाळी व रात्रीपाळी यामध्ये किमान बारा तास विश्रांतीचा वेळ असला पाहिजे.उद्योग व कामगार विभागाने अन्य कामगारासंदर्भातही नियमावली जारी केली असून, नियमांचा मसुदा ‘महाकामगार डॉट महाराष्टÑ डॉट गव्ह डॉट इन’वर उपलब्ध आहे.-------------------------सुरक्षित वाहतूक व्यवस्था...- सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्रपाळीत काम करणाºया महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणाहून घराच्या दारापर्यंत तसेच घराच्या दारापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितीत असलेली स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. आस्थापना मालकाकडे, त्याने स्वत:हून कामावर ठेवलेल्या किंवा कोणत्याही एजन्सी ठेकेदारामार्फत कामावर ठेवलेल्या वाहन चालक, सुरक्षा रक्षक आणि सर्व कर्मचाºयांचा तपशील असावा तसेच महिलांना ने-आण करणाºया सर्व कामगारांची चारित्र्य पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिला