शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

interview; लिंगभेद न करता आपल्या मुलांना माणूस म्हणून वाढवलं पाहिजे - मधुरा वेलणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 15:28 IST

सोलापूर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा मुलगी म्हणजे प्रकाश देणारी पणती, असे पारंपरिक शब्द वापरून लिंगभेद न करता ...

ठळक मुद्देलोकमत सखी मंच व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवासदन प्रशालेत (वॉक फॉर कॉझ) ‘बेटी बचाओ, बेटी  पढाओ’ जनजागृती अभियान रॅलीजातीयवाद, ध्येयवाद, धार्मिकवाद, राजकीयवाद यातून बाहेर पडण्याची गरज - वेलणकर

सोलापूर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा मुलगी म्हणजे प्रकाश देणारी पणती, असे पारंपरिक शब्द वापरून लिंगभेद न करता आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून वाढवलं तर नक्कीच त्यांचं जीवन प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

समाजात मुलगा-मुलगी या लिंगभेदाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकमत सखी मंच व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवासदन प्रशालेत (वॉक फॉर कॉझ) ‘बेटी बचाओ, बेटी  पढाओ’ जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की,  ‘आपण खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही या ठिकाणी अस्तित्वात आहात, म्हणून समोर बसलेल्या मुलींनो जीवन खूप सुंदर आहे, त्याचा खºया अर्थानं आस्वाद घ्या अन् आपल्या स्वप्नांना नवे पंख देऊन प्रगती साधा.प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींनी वाचविलं तर पाहिजेच पण त्याचबरोबर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, तर त्या मुलींना त्यांचे असलेले हक्क, त्यांच्याविषयीचे कायदे याचा अभ्यास असेल़ अन ते त्या स्वत:साठी लढू शकतील. मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये. आपल्या घरातून, संस्कारातून याला बळ मिळेल़ जी कामे मुली करतात ते मुलांना करू द्या...जे कामे मुलं करतात ते मुलंींना करू द्या़  मुलगा-मुलगी असा भेदभाव न करताना माणूस म्हणून जगू द्या असा सल्ला मधुरा वेलणकर यांनी यावेळी दिला.

पारंपारिक संस्कृती, रितीरिवाज, चालीरितीत न अडकता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील जीवन जगा़ आपले जग, देश, राज्य कुठे चाललंय हे पाहत नव्या पिढीने बदल करून घ्यायला हवेत़ जातीयवाद, ध्येयवाद, धार्मिकवाद, राजकीयवाद यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही वेलणकर म्हणाल्या. 

टॅग्स :Solapurसोलापूरwomen and child developmentमहिला आणि बालविकासMadhura Velankar-Satamमधुरा वेलणकर