शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत ; सोलापुरच्या विकासासाठी राजकीय-शासकीय पुढाकारही हवा - यतीन शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:21 IST

प्रिसिजन उद्योग समुह कंपनीचे संचालक यतीन शहा यांच्याबरोबर सोलापुरातील उद्योग क्षेत्राविषयी साधलेला हा संवाद.

ठळक मुद्देसोलापुरात मुबलक जागा आहे. मनुष्यबळही आहे - यतीन शहाविमानतळ, दळणवळणाची कनेक्टिव्हिटी, प्रभावी दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा यात आपण मागे - यतीन शहासर्वसमावेशी प्लॅटफॉर्म उभारण्याची आवश्यकता - यतीन शहा

सोलापूर : सोलापूरातच नव्हे तर जगप्रसिध्द असलेल्या सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट्सने उद्योग क्षेत्रात अनेक शिखरे पादाक्रांत केलेली आहेत़ चीन, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशात प्रिसिजन उद्योग समुहाने उद्योगाचे जाळे निर्माण केले.  प्रिसिजन उद्योग समुह कंपनीचे संचालक यतीन शहा यांच्याबरोबर सोलापुरातील उद्योग क्षेत्राविषयी साधलेला हा संवाद.

प्रश्न : सोलापुरातील उद्योगाविषयी काय सांगाल ?उत्तर : सोलापूरचे मार्केटिंग करायचे झाले की येथील चादर, शेंगा चटणी, कडक भाकरींचीच चर्चा आधी होते. खरे तर या गोष्टी जुन्या झाल्या. शहराचा औद्योगिक विकास करायचा असेल तर बाहेरच्या उद्योजकांना हे दाखवून चालणार नाही. 

प्रश्न : सोलापुरात बाहेरील उद्योग येत नाहीत ?उत्तर : सोलापुरात उद्योग निर्मितीला पोषक वातावरण आहे़ मनुष्यबळ तसेच रोजगाराच्या दृष्टीने सोलापूरात चांगले वातावरण आहे़  शहरात दाखविण्यासारखे आणि सांगण्यासारखे बरेच काही आहे. मात्र त्यासाठी राजकीय मंडळींचा आणि प्रशासनातील अधिकाºयांचा पुढाकार हवा़ तरच सोलापुरात बाहेरील राज्य तसेच देशातील उद्योग येण्यास अडचण असणार नाही.

प्रश्न : सोलापुरातील सुविधाबाबत काय सांगाल ?उत्तर : .केवळ आठ-दहा जणांनी काम करून चालणार नाही. सर्वांचाच हातभार यात हवा आहे. सर्वसमावेशी प्लॅटफॉर्म उभारण्याची आवश्यकता आहे. ज्या सुविधा पुण्यात नाहीत, त्या सोलापुरात सहज उद्योजकांना मिळवून देता येतील. पुण्यात जागेची मोठी अडचण आहे. सोलापुरात मुबलक जागा आहे. मनुष्यबळही आहे. कोल्हापुरात उद्योजकांचे सर्व बाजूंनी स्वागत केले जाते. त्याचा अभाव सोलापुरात दिसतो. त्याची कारणे शोधण्याची गरज आहे. 

प्रश्न : उद्योजक सोलापुरात येण्यासाठी आपण काय कराल ?उत्तर : सोलापुर सारख्या शहरात आयटी इंडस्ट्रीज यावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र अन्य तांत्रिक बाजू दुबळ्या आहेत. विमानतळ, दळणवळणाची कनेक्टिव्हिटी, प्रभावी दूरसंचार सेवा, इंटरनेट सेवा यात आपण मागे आहोत, याचा विचार करायला हवा. अन्य मोठ्या उद्योजकांनी येथे यावे, यासाठी प्रिसिजनच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक उद्योजकांनीही यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय यश येणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका