शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

International Tea Day: ‘कुणी जमुना, कुणी घ्या लेमन’; वेगवेगळ्या फ्लेवर्समधील 'लय भारी' चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 18:47 IST

‘लेमन’ घ्या, कुणी ‘जमुना’; चाय सोलापुरी लई भारी!

रवींद्र देशमुख

सोलापूर: जाऊ दे याऽऽर, आता त्याला काही बोलू नको, सकाळी वॉकिंगला गेल्यावर कॅन्टीनमध्ये चहा घेत समजावून सांगू...गडबडीत कशाला सांगतोय, दुपारी जमुना घेत प्लॅनिंग करूयात...सोलापुरात हे संवाद सर्रास कानावर पडतात..चहाशौकीन सोलापूरकरांचं असं सारं कॅन्टीनवरच ठरतं.

आता अचानक चहाचा विषय कशाला? तुम्हाला प्रश्न पडला असेल.. आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे ना शनिवारी, म्हणूनच हे चहापुराण. काही शक्कल लढवायची असेल, कुणाला काही सुनावायचे असेल अथवा उगीचच गप्पा मारायच्या असतील तर आमचे सोलापूरकर थेट कॅन्टीनचा रस्ता धरतात..बरं आवडीनं चहा पिणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही..रामलाल चौकात राहणाऱ्या एखाद्याला जर जमुना किंवा उकाळा प्यायची हुक्की आली तर तो आपली गाडी काढेल, चौपाडातील मित्राला मागे बसवले अन जाईल चाटी गल्लीत.  ‘जमुना’ घ्यायला.. शशिकांत पवार यांनी या स्पेशल चहाचं नाव ‘गंगा जमुना’ ठेवलंय. लोक त्याला जमुना म्हणतात.. चहामध्ये कधी काळे मिरे असतात का?   पण ‘जमुना’मध्ये असतात. शिवाय वेलची, जायफळ, अद्रक अन लवंगही! एक एक घोट अगदी तरतरी आणणारा. चाटी गल्लीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा प्रारंभ हा चहा घेतच होतो.. उकाळा प्यायचा असेल तर बदाम, पिस्ता अन् विलायचीची चव तुम्हाला खूष करून टाकते. 

अमृततुल्य चहा तर साऱ्या शहरवासींना ठाऊक आहे. एखादा चहाप्रेमी कधी काळी मशीद, पत्रा तालीम, एसटी स्टँडवर आला की, संतोष पवारांच्या ‘’अमृततुल्य’’ची टेस्ट घेतोच. या चहाचं कॉम्बिनेशन इतकं अनोखं की, ही चव फक्त इथेच घेता येते.. जणू अमृतच.‘’रा बावा’’... म्हणत पूर्व भागातील सरगम कॅन्टीनमध्ये सर्वांचे सन्मानपूर्वक स्वागत होते. नागेश सरगम यांच्या या कॅन्टीनमध्ये दररोज गप्पांची मैफल रंगते. राजकारणावर तर जोरजोरात चर्चा होते. इथे तुम्हाला लेमन, ग्रीन चहा तर मिळतोच, पण कोरोनाचा दुश्मन आयुष काढाही मिळतो.

दोन घागरी चहा !

इंद्रभुवनाच्या पाठीमागे शुभराय गॅलरीजवळ लक्ष्मीबाई डुंबाळे यांची कॅन्टीन आहे. त्या सकाळपासून अविरत चहा तयार करत असतात. त्यांच्या लेमन चहाचं गिऱ्हाईकच हटत नाही..काळ्या चहामध्ये अद्रक, पुदिना अन लिंबाच्या चकतीनं सजवलेला चहाचा कप पाहिला की, टेस्टची आयडिया येते..एक तिथं दोन कप चहा पिला जातो..दिवसात दोन घागर चहा विकला जातो..लक्ष्मीबाई सांगत होत्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अन युवा नेते रोहित पवार यांनीही त्यांचा चहा घेऊन कौतुक केलं.

शहरातील ‘टी’ स्पॉट

सोलापुरात चहाचे अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत..सात रस्ता चौकात आलं की, ‘इंडिया’चा चहा भर रस्त्यावर उभे राहून पिल्याशिवाय अस्सल चहाशौकीन पुढे जातच नाही..तिथलं बूस्टही छान असतं.जर तुम्हाला मधुमेह आहे आणि थोडा गोड चहा घ्यायचा आहे, तर ‘जी’ चा लाईट चहा प्यायला आसरा चौकात यावेच लागेल.जिल्हा परिषदेच्या आवारात लॉकडाऊन पूर्वी खजूर चहा मिळायचा आता तो नाही, पण तिथला लेमन चहाही मस्त आहे.बेगम पेठेतील इराणी चहाही खास आहे. पण तुम्हाला रात्री दहानंतर बाहेरचा फक्कड चहा पिण्याची इच्छा झाली तर बिनधास्त विजापूर वेसेत या. त्यानंतर अपरात्रीही चहा प्यायचा असेल तर बारा इमाम चौकातील मोहोळकर कॅन्टीन तुमच्या सेवेला सज्ज असेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारण