आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : प्रिसिजन फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ़ जब्बार पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभात थिएटर येथे होणार आहे़ प्रभात, भागवत व उमा मंदीर या चित्रपटगृहात एकूण २० आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ उदघाटन सोहळ्यास प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते मधुर भांडारकर हे उपस्थित राहणार आहेत़ या महोत्सवात ब्राझील, अर्जंटिना, नेदरलँड, फिलिपाईन्स, जपान, चीन, स्पेन, हंगेरी आणि भारतातील दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ यात पिंपळ, पळशीची पेटी आदी ३ मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ याशिवाय सात भारतीय चित्रपटांचा समावेश आहे़यावेळी बोलताना डॉ़ जब्बार पटेल यांनी सांगितले की, या महोत्सवामुळे जगभरात विविध क्षेत्रात जी खळबळ सुरू आहे, ती पहायला मिळणार आहे़ यंदाच्या महोत्सवाची थिम युथ (तरूण) आहे़ या महोत्सवातील सर्वच चित्रपट युवकांशी संबंधित असतील़ तरूणाईसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे असेही डॉ़ पटेल म्हणाले़या पत्रकार परिषदेस प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ़ सुहासिनी शहा, प्रभात चित्रपटगृहाचे संचालक दिपक पाटील, भागवत व उमा मंदीर चित्रपटगृहाचे संचालक भरत भागवत, मधुरा शहा आदी उपस्थित होते़
सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:51 IST
प्रिसिजन फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे
सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश
ठळक मुद्दे- प्रिसिजन फाउंडेशनतर्फे दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आयोजन- प्रभात, भागवत, उमा मंदीर चित्रपटगृहात सादरीकरण