शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

intarview : मुलांना पोटभर खाऊ घाला अन् रूबेलाची लस द्या : डॉ़ संतोष नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 11:43 IST

लसीकरण सुरक्षित : सुदृढ पिढीसाठी आरोग्य अधिकाºयांचा पालकांना सल्ला

ठळक मुद्दे धनुर्वात या मोहिमांच्या धर्तीवर मिझेल्स रुबेला लसपोलिओमुक्ती झाली़ पोलिओमुक्तीसाठी २३ वर्षे शासनाने मोफत लस पुरवली़ १९८५ पासून जन्मलेल्या बाळाला नवव्या महिन्यात मिझेल्स लस दिली जात आहे

सोलापूर : गैरसमज, निष्काळजीपणातून रुबेलाबाबत चर्चा होते आहे़ भावी पिढी सुदृढ व्हावी म्हणून पोलिओ, स्मॉल फ ॉक्स, धनुर्वात या मोहिमांच्या धर्तीवर मिझेल्स रुबेला लस दिली जात आहे. या लसीचे वाईट परिणाम नाहीत, पोटभर खाऊ घालून पाल्यांना ही लस द्या, असा सल्ला महापालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले यांनी लोकमतशी बोलताना दिला आहे.

प्रश्न : रूबेला लसची मोहिम किती वर्षाची आहे ?१९९५ पासून पोेलिओ लस सुरू करण्यात आली. पोलिओमुक्ती झाली़ पोलिओमुक्तीसाठी २३ वर्षे शासनाने मोफत लस पुरवली़ त्यापूर्वी १९८५ पासून जन्मलेल्या बाळाला नवव्या महिन्यात मिझेल्स लस दिली जात आहे. आता सुदृढ पिढीसाठी केवळ दोन वर्षात ही मोहीम राबविली जात आहे.

प्रश्न : रूबेला लसीकरण मोहिम कशी यशस्वी ठरेल ?समाजात कम्युनिटी-इम्युनिटीच्या जोरावर पोलिओची मोहीम  यशस्वी ठरली़ आता यापुढे याच कम्युनिटी-इम्युनिटीच्या जोरावर मिझेल्स रुबेला मोहीम राबविली जात आहे़ ही राष्ट्रीय मोहीम  आहे.

प्रश्न : मिझेल्स रुबेला लसीकरणाबाबत काय सांगाल ?यापूर्वी मूल जन्मल्यानंतर नवव्या महिन्यात केवळ ‘मिझेल्स’ लस दिली जात होती़ त्यानंतर खासगीमध्ये पालक रुबेला लस देत होते़ आता शासनाने दोन्ही लस एकत्रित करून ती सरकारमार्फत पुरवत आहे़ दोन वेळा दिल्या जायच्या लसी आता दोन्ही एकत्रित केलेली लस दिली जात आहे़ पाल्य आणि पालकांच्या दृष्टीने ‘पॉवरफुल लस’ ठरणारी आहे़ यापुढे नवव्या महिन्यात कुठेही मिझेल्स रुबेला हीच लस दिली जाणार आहे़ २०२० पर्यंत ही मोहीम पोलिओच्या धर्तीवर प्रभावीपणे राबवली जाणार आहे़ 

प्रश्न : लसीकरण दरम्यान पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी ?उत्तर : ज्या दिवशी लस द्यायची आहे त्या दिवशी पाल्याला पोटभर खाऊ घाला, मगच लस द्या़ उपाशीपोटी लस अजिबात देऊ नका़- ताप वा अन्य कुठला मोठा आजार असेल तर ही लस देऊ नका़ तसे लस देणाºया वैद्यकीय तज्ज्ञांना सांगा.- ही लस सक्तीची नाही़ भावी पिढीच्या सुदृढतेसाठी असून ती दिली जात असून, पालकांनी उपस्थित राहूनच ती लस पाल्यांना घ्यावी़- लस दिल्यानंतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली अर्धा तास राहा़ मगच पाल्याला घरी घेऊन जा.

-प्रश्न : लसीकरणानंतर काही वेगळा परिणाम जाणवल्यास पालकांनी काय करावे ? उत्तर : लसीनंतर काही वेगळा परिणाम जाणवल्यास तेथील डॉक्टरांशी संपर्क साधून दिलेल्या एआयएम कीट वापरा़ या कीटमध्ये सलाईन, ओआरएस पाकीटसह आवश्यक औषधे, साधने आहेत़ प्रत्येक शाळेला प्रशिक्षित डॉक्टर दिला असून, त्यांची मदत घ्या.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाHealthआरोग्यMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर