शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

३ हजारांत ५ लाख देऊन विमा कंपन्यांनी तारलं; रूम, बेड, डॉक्टर्स चार्जेस्‌ ज्यादा लावून हॉस्पिटलनं लुटलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 15:44 IST

कोरोनाची दुसरी लाट - शासनाच्या योजनांचाही झाला सर्वसामान्यांना फायदा

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : ३ हजारांची आरोग्य विमा पॉलिसी देऊन तीन ते पाच लाखांपर्यंत हॉस्पिटल बिल भरले; पण शासन निर्णय असताना हॉस्पिटल प्रशासनाने रूम, बेड, डॉक्टर्स, नर्सेस्‌, लॅब टेस्ट यासह अन्य विविध प्रकारचे चार्जेस्‌ लावून हॉस्पिटल प्रशासनानेच लुटल्याची धक्कादायक माहिती एका कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कोरोनाकाळात आरोग्य विमा कंपन्यांपेक्षा हॉस्पिटल प्रशासनाने उपचार खर्चात अचानकपणे वाढ करून रुग्णांची आर्थिक कोंडी केली. याच काळात शासनाच्या विविध आरोग्य योजनांनीही सर्वसामान्य रुग्णांना चांगली मदत केली. दरम्यान, शासकीय रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांनी उपचार घेतल्यानेही अनेकांचे पैसे वाचल्याचे दिसून आले.

विमा रकमेत अशी झाली कपात

वास्ताविक शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे हॉस्पिटलने बिल आकारणे गरजेचे होते. त्यानुसारच आरोग्य विमा कंपन्या संबंधित रुग्णांना बिलाचे पैसे देतात. मात्र, हॉस्पिटल प्रशासनााने चुकीच्या पद्धतीने व अवाढव्य बिले लावल्याने आरोग्य विमा कंपन्यांनी ती स्वीकारली नाहीत. शासनाच्या नियमांप्रमाणे किंवा पॉलिसीमधील अटी व नियमांप्रमाणे संबंधित रुग्णांना बिलांचे पैसे अदा केले, खर्च जास्त अन् बिलाचे पैसे कमी हातात मिळाल्याने अनेक रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागली.

-------

यामुळे बसतो रुग्णांना फटका..

कोरोना रुग्णांचा विमा कॅशलेस असेल, तर संपूर्णपणे बिल हॉस्पिटल प्रशासन विमा कंपनीकडून वसूल करते. विमा कंपन्यांना हवे असलेले सर्व रिपोर्ट, बिले सादर केली जातात. मात्र, रिइम्बुसमेंट (खर्चाची भरपाई) फाइल सादर केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे हॉस्पिटलचा झालेला खर्च अन् आरोग्य विमा कंपन्यांकडून दिली जाणारी खर्चाची भरपाई यात मोठी तफावत आढळून येते. त्यामुळे रुग्णांना आरोग्य विमा कंपन्यांकडून लुटले जाते, असे म्हणण्यात येते.

---------

असा वाढला खर्च...

  • आरोग्य विम्यात समाविष्ट असताना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन, मेडिसिन बाहेरून आणायला लावण्यात आले होते.
  • एका डॉक्टरांकडून वॉर्डातील १० ते २० लोकांना एकच पीपीई किट घालून तपासणी होते. मात्र, पीपीई किटचे १,००० ते ३,००० रुपये प्रत्येक रुग्णाच्या बिलात लावले जात होते.
  • काही हॉस्पिटल प्रशासनाने कोरोना रुग्णांच्या बिलात बायोेमेडिकल चार्जेस्‌ही लावल्याचे एका रुग्णाने सांगितले.
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या