शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी करा पण धमक्या देऊ नका; सुभाष देशमुख यांची टिपण्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 20:02 IST

भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या चौकशीची चर्चा सुरू; भाजपचे मंगळवारी धरणे आंदोलन

ठळक मुद्दे- सुभाष देशमुख यांनी केली महाविकास आघाडीवर टिका- भाजप मंत्र्यांच्या चौकशी करीत असाल तर सहकार्य करू - देशमुख- भाजप सरकारने घेतलेले निर्णय रद्द करणे चुकीचेच - देशमुख

सोलापूर : भाजप सरकार मधील मंत्र्यांच्या चौकशीची चर्चा सुरू आहे राज्य सरकारने खुशाल चौकशी करावी केवळ धमक्या देऊ नयेत आमची मन विचलित करण्याचा प्रयत्न करू नये अशी टिप्पणी माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बोलताना केली.        भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य सरकार करणार असलेल्या कथित चौकशी संदर्भात बोलत होते. ते म्हणाले त्यांनी चौकशी केली पाहिजे चौकशी करण्याच्या धमक्या घेऊन आमची मन विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आम्ही चौकशीला सामोरे जाऊ विनाकरण भीती घालण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असा सल्लाही त्यांनी दिला.

फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंच नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीच्या सरकारने तो निर्णय रद्द करून ग्रामपंचायत सदस्यातुन सरपंच निवडण्याचे विधेयक सादर केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना दिलेला मतदानाचा अधिकारही या सरकारने काढून घेतला आहे़ दोन्ही निर्णय चुकीचे असून मूठभर लोकांच्या हाती सत्ता देण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. जनता त्यांना मत देत नाही मात्र ठराविक लोकांना सांभाळून, प्रसंगी त्यांना पळवून नेता येते आणि सत्ता काबीज करता येते यासाठी हा आटापिटा असल्याचे त्यांनी सांगितले.      --------आधी वनखात्याची जमीन ताब्यात घ्याबोरामणी विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने ५० कोटी निधीची तरतूद केली आहे याकडे आमदार सुभाष देशमुख यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आता विमानतळ व्हायला हरकत नाही विमानतळाची नियोजित जमीन वनखात्याची आहे आधी ही जमीन तरी ताब्यात घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपा