शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मराठी ज्ञानभाषेसाठी सोलापूरवासीयांचा पुढाकार, विकीपीडिया मुक्त ज्ञानस्रोतात योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:08 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७  : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठ व दयानंद कॉलेज येथे विकीपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली. यामध्ये एकूण ७४ संपादक सहभागी झाले होते. काही संपादकांनी मराठी ...

ठळक मुद्देएका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात मराठी भाषा संवर्धनासाठी वैविध्यपूर्ण लेखनमराठी भाषेच्या संवर्धनासाठी सहभागी झालेल्या संपादकांनी सोलापूर शहरातील प्रसिद्ध व्यक्ती, मंदिरे, जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, संस्कृती, घटना तसेच संगणक तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य आदी विषयांवर ज्ञानकोशात लेखन केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७  : मराठी भाषा पंधरवड्यानिमित्ताने राज्य मराठी विकास संस्था आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी या संस्थेतर्फे सोलापूर विद्यापीठ व दयानंद कॉलेज येथे विकीपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली. यामध्ये एकूण ७४ संपादक सहभागी झाले होते. काही संपादकांनी मराठी भाषा दिनापर्यंत लिखाणात सातत्य ठेवून विकीपीडिया यामुक्त ज्ञानस्रोतात भरीव योगदान केले आहे. या कालावधीत एकूण १७० लेख नव्याने तयार केले गेले तर ४५० लेखांमध्ये संपादने करण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या बाळकृष्ण माळी, राजशेखर शिंदे, रविकिरण जाधव, अक्षय वाघमोडे, संताजी चावरे, रणजित पाटील, ओंकार आमणगी, गौरीशंकर देशमाने, निखिल सुरवसे, किशोर कारभारी, शालगर डी. जे. यांनी योगदान केले. तसेच डीएचबी सोनी महाविद्यालयाचे प्रा. अरविंद बगले यांनीही भरीव योगदान केले आहे. यापैकी इंद्रभवन सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे, सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख, महर्षी दयानंद सरस्वती वस्तुसंग्रहालय, पंडित गुरूदत्त विद्यार्थी, महात्मा हंसराज, महाराष्टÑातील वारसा स्थळे, सोलापूर शहर, बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रविषयक विचार, हंबीरराव मोहिते, थोरले शाहू महाराज, मोकासा, हे लेख सर्च टाकून नागरिकांनी जरूर पाहावेत आणि प्रतिक्रिया द्याव्यात, असे आवाहन केले आहे. पुणे येथे झालेल्या प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत बाळकृष्ण माळी व अरविंद बगले हे सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी विकीपीडिया समन्वयक सुबोध कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिकाधिक नागरिकांनी याचे प्रशिक्षण घेऊन ज्ञान निर्मितीत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने करण्यात आले असून, प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागासाठी दयानंद महाविद्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे यांनी केले आहे.----------------------------मराठी भाषा संवर्धनासाठी वैविध्यपूर्ण लेखन- मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सहभागी झालेल्या संपादकांनी सोलापूर शहरातील प्रसिद्ध व्यक्ती, मंदिरे, जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, संस्कृती, घटना तसेच संगणक तंत्रज्ञान, विज्ञान, साहित्य आदी विषयांवर ज्ञानकोशात लेखन केले आहे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने विविध संदर्भांचा शोध घेत हे लेखन केले. निरपेक्ष आणि सामूहिक कामाचा आनंद सर्वांनी घेतला.

टॅग्स :SolapurसोलापूरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018