शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सोलापुरातील सात अभियांत्रिकी महाविद्यालयाची बाटूसह उद्योगाभिमुख शिक्षणाकडे वाटचाल, कुलगुरू डॉ़ विलास गायकर यांची माहिती

By admin | Updated: June 3, 2017 17:48 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूर

सोलापूर दि ३ - महाराष्ट्र शासनाने या शैक्षणिक वषार्पासून स्वतंत्र तंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटी (बाटू)ची स्थापना येत्या शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून होत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रात बाटूची स्थापना २५ वषार्पूर्वीच झालेली आहे. बाटूमधुन बाहेर पडलेले विद्यार्थी आज कापोर्रेट जगतात उच्चस्थानी कार्यरत आहेत, अशी माहिती बाटू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी नागेश करजगी आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्या वर्षी एकूण ६३ महाविद्यालयांना बाटूची संलग्नता देण्यात आली. यात ४८ अभियांत्रिकी, ३ आॅकिटेक्चर, १२ फार्मसी महाविद्यालयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमातील व परीक्षा पध्दतीतील बदल हे बाटू विद्यापीठाचे इतर विद्यापीठांपेक्षा वेगळेपण राहणार आहे. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रकरिता एकच असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारेल. अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम समितीमध्ये ५० टक्के इंडस्ट्री स्पेशालिस्ट व ५० टक्के शैक्षणिक तज्ञ यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे सदर अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख व दजेर्दार ठरेल. यामध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर विशेष भर देण्यात येईल, यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सहाव्या सत्रानंतर सहा ते आठ आठवड्यांचे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग करावे लागेल. आठव्या सत्रात विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्नांशी संदर्भ असलेले व इंडस्ट्री स्पॉनसर प्रोजेक्ट करावे लागेल, ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाचा समाजाला तसेच उद्योग जगताला उपयोग होईल.बाटूची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे नवीन शिक्षकांना टिचिंग स्कील डेव्हल्प करण्यासाठी दोन आठवड्यांचा वर्कशॉप बंधनकारक असेल तसेच सेवेत असेलेले शिक्षकांना शैक्षणिक कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी दर तीन वर्षांनी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग अनिवार्य राहील.परीक्षा पध्दतीतील बदलांवर बोलताना त्यांनी असे नमूद केले की, विद्यार्थ्यांचे कन्टिनिवस असेसमेंट करण्यात येईल, यासाठी ४० टक्के असेसमेंट महाविद्यालय अंतर्गत राहील व ६० टक्के असेसमेंट हे युनिव्हर्सिटीच्या परीक्षेमार्फत केले जाईल.रोजगाभिमुख शिक्षण पध्दती देताना विद्यार्थ्यांच्या सेंट्रल प्लेसमेंटबाबत ही विद्यापीठ विशेष लक्ष देईल. आता अभियांत्रिकीची पदवी ही बी.ई. किंवा एम.ई. न मिळता बी.टेक/एम.टेक मिळणार आहेत. याचा निश्चितपणे फायदा उच्च शिक्षण तसेच चांगल्या नोकऱ्या मिळण्यासाठी होणार आहे.यावेळी पत्रकार परिषदेस एन.के. आॅर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव एन.एम. पाटील व प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार, विद्याविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. जी.के. देशमुख, ए.जी. पाटील इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. एस.ए. पाटील, भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकीचे सचिव रवि गायकवाड, प्राचार्य एम.डी. पाटील, फॅबटेक सांगोलाचे अध्यक्ष भऊसाहेब रूपनर व प्राचार्य प्रा. सर्जे, प्रा. जगताप, भगवंत इन्स्टिट्यूट बाशीर्चे प्रा. मुंढे, श्रीराम इन्स्टिट्यूट पानीवचे प्राचार्य व जनता बँकेचे संचालक महेश अंदेली आदी उपस्थित होते.