शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसºया स्थानावर पोहोचेल : शैलेंद्र देवळाणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:37 IST

२०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल

ठळक मुद्देआज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केलीचांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़

सोलापूर : आर्थिक धोरणासाठी परिपक्व होण्यासाठी साधारणत: ३० वर्षे लागतात़ चीनने आपली आर्थिक नीती ही १९८१ मध्ये सुरू केली. यामुळे आता जगातील मार्केटमध्ये सध्या चीनी वस्तू दिसत आहेत. भारताने आर्थिक धोरणासाठी १९९१ मध्ये नीती सुरू केली.  आता भारत परिपक्वतेच्या उंबरठ्यावर थांबला आहे. यामुळे २०२१ नंतर भारताचे दिवस येणार आहेत. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असेल. भारतीय अर्थव्यवस्था ही जगात तिसºया स्थानी पोहोचेल़ पहिल्या क्रमांकावर चीन त्यानंतर अमेरिका आणि तिसºया स्थानी भारत असेल असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉ़ शैलेंद्र देवळाणकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

पुढे बोलताना डॉ. देवळाणकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र धोरणासाठीची आतापर्यंत ७५ देशांचे ९० दौरे केले आहेत. आतापर्यंत एवढे दौरे कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी केले नाही असे सांगितले जाते़ यामुळे त्यांच्या दौºयावर किती खर्च झाला याची माहिती माहिती अधिकार खाली मागितली जात आहे़ ती रक्कम जवळपास २५० कोटीपर्यंत आहे. पण या रकमेची तुलना अमेरिका, चीन आणि जपानचे राष्टÑाध्यक्षांची तुलना केल्यास त्यांच्या १० टक्के ही हे दौरे नाहीत.

चांगल्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक चांगले बदल होत आहेत.  १९९० ते १९९३ दरम्यान भारताला इतर देशांना पैसे मागावे लागत होते़ पण आज परिस्थिती बदलली आहे़ आज आपण आपल्या शेजारी देशांनाही मदत करत आहोत़ याच बरोबर जागतिक बँकेलाही आपण पैसे देत आहोत़ दहा वर्षात विकास दर वाढत आहे़ आज देशात ४५० अब्ज डॉलर आपल्या फॉरेन्सिक इन्व्हेसमेंट केली आहे. 

७० टक्के तेल आखातातून- आज अमेरिका आणि आखाती देशात जी युद्धजन्य परिस्थिती आहे़ याचा परिणाम आपल्यावर होत आहे. कारण आपल्या देशाला जेवढे पेट्रोल आणि डिझेल लागते यातील ८५ टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते़ या ८५ टक्क्यांपैकी जवळपास ७० टक्के तेल हे आखाती देशामधून आयात केले जाते. तेथील तणावाच्या परिस्थितीमुळे आज बॅरेलचे दर वाढत आहेत़ तेथे एक  पैशाची जरी वाढ झाली तर कोट्यवधीचा फटका आपल्याला बसतो़ असे मत यावेळी डॉ़  देवळाणकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरIncome Taxइन्कम टॅक्सIndiaभारत