शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम आंदोलन; पगार मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 09:48 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने व शासनाकडून वेतन अनुदान न मिळाल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून पगार न झाल्याने २९ डिसेंबर रोजी नगर परिषदेसमोर कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, राज्याचे सरचिटणीस सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारेसह कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे या हेतूने शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन होणे आवश्यक आहे, परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहाय्यक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने  नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या मार्च महिन्यापासून काम करीत आहेत परंतु शासनाकडून गेल्या दोन वर्षापासून सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेनंतर दिली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होतो परंतु  शासनाकडून अद्याप पर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम पंढरपूर नगरपरिषदेला दिली गेली नाही, त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहिला आहे त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सहाय्यक वेतन अनुदान मिळावे म्हणून शासनाचे  या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद सुरू करण्यात आले आहे.दरम्यान,  काम बंद आंदोलनचे निवेदन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्ष साधना भोसले यांना संघटनेचे अध्यक्ष महादेव अदापुरे, सरचिटणीस सुनील वाळुजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागन्नाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, अनिल गोयल यांच्या शिष्टमंडळाने दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरStrikeसंप